Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bad News : धक्कादायक : कोरोनाच्या विलगीकरण वार्डात आरोग्य कर्मचाऱ्याने गरोदर महिलेवर बलात्कार केल्याने मृत्यू ….

Spread the love

” कामातुराना भय ना लज्जा !! ” असे म्हटले जाते . संपूर्ण जग आणि देश  कोरोनाच्या दहशतीत असतानाही  एका नराधमाने कोरोना वॉर्डमध्ये दाखल झालेल्या महिलेवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लाजिरवाणी आणि धक्कादायक बाब म्हणजे तिच्यावरील लैंगिक अत्याचारा नंतर पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी असलेल्या त्या नराधमावर बलात्काराच्या  आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सदर पीडित महिलेवर दोन दिवस बलात्कार करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील गयाच्या अनुग्राह नारायण मगध मेडिकल कॉलेज व रुग्णालयात (एएनएमएमसीएच) सदर पीडित  गरोदर महिलेला उपचारासाठी दाखल केले होते. इथे एका आरोग्य कर्मचाऱ्याने तिच्यावर  सलग दोन दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा गरोदर महिला रुग्णालयातून बाहेर पडली आणि घरी पोहचली तेव्हा तिला तीव्र रक्तस्त्राव झाला आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात महिलेच्या सासूने रोशनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.विजय कृष्णा प्रसाद यांनी एकत्र येऊन चौकशी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी ही महिला लुधियानाहून आपल्या पतीसमवेत आली होती. येथे आल्यानंतर त्यांना २७ मार्च रोजी मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. महिलेने दोन दिवस कोरोनाची चिन्हे दर्शविली, त्यानंतर तिला विलगीकरण वॉर्डमध्ये हलविण्यात आले. या महिलेचीही कोरोना टेस्ट झाली होती आणि अहवालही नकारात्मक होता. त्यानंतर महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण दुसर्‍याच दिवशी तिचा मृत्यू झाला . याबाबत मृत गरोदर महिलेच्या सासूने सांगितले की, रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने दोन दिवस तिच्या सूनेवर बलात्कार केला. यामुळे, तिच्या गर्भावर परिणाम होऊन जास्त रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. सासूच्या म्हणण्यानुसार, कोरोना वॉर्डमध्ये आलेल्या एका आरोग्य कर्मचार्‍याने तिच्यावर बलात्कार केल्याची खबर सूनेने दिली होती. सासू म्हणाली की, माझी सून याबद्दल तक्रार करणार होती, तेव्हा इस्पितळातील गेटमॅनने तिला इज्जतीची भीती दाखवली. ती घाबरली आणि तिने तक्रार केली नाही. घरी आल्यानंतर ती वारंवार आरोग्य कर्मचार्‍याच्या चुकीच्या वागण्याचा उल्लेख करत होती. सासू पुढे म्हणाली की, माझी सून व तिच्या जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार आरोग्य कर्मचारी आहे. माझ्या सूनेला कोरोना वॉर्डात पाठवलं नसतं तर असं झालं नसतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!