Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : आयुष मंत्रालय आणि आयसीएमआर Covid -19 वर लास शोधण्याच्या तयारीत….

Spread the love

जगभरातील सर्व देश आणि जग कोरोना व्हायरसमुळे हैराण झालेले  असताना कोरोनाविरुद्ध औषध नसल्याने जग सध्या हतबल झाले  आहे. जगभर मृत्यूची संख्या वाढत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी योग्य औषधाची गरज असून त्यासाठी जगभरातील संशोधक संशोधन करीत आहेत. भारतातही अनेक संस्था आणि सरकारी रिसर्च लॅबमध्ये यावर संशोधन सुरू आहे. देशात ४० पेक्षा जास्त लसींवर संशोधन सुरू असल्याची माहिती आयसीएमआरचे डॉ. मनोज मुऱ्हेकर यांनी दिली. पण हे संशोधन पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्यातरी त्यावर औषध सापडल्याचा दावा करता येणार नाही असही त्यांनी सांगितलं. सध्या दररोज १५ हजाराहून अधिक लोकांची चाचणी करण्यात येत असून त्यापैकी  ५८४ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याचंही त्यांनी सांगितले.

दरम्यान केंद्रीय आयुष मंत्रालयाने आता कोरोनावर उपाय शोधण्यासाठी टास्क फोर्स तयार तयार केले असल्याचे वृत्त आहे. आयुष मंत्रालय आणि आयसीएमआर मिळून हे संशोधन करणार आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे वेगळ्या अंगाने काही संशोधन करता येऊ शकते का याचं संशोधन हा टास्क फोर्स करणार आहे. आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून वैज्ञानिक आणि आयुर्वेदीक-होमिओपॅथिक डॉक्टर्स यावर उपाय शोधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आयुष मंत्रालयाला सूचना केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!