Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांचा ९ वी , १० वी आणि अकरावीसाठी मोठा निर्णय….

Spread the love

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला असून, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे . देशात सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग  महाराष्ट्रात वाढला आहे. याचा विचार करुन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. २१मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र २३ मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. याआधी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा  वाढला 

राज्यात आतापर्यंत १ हजार ८९५ प्रकरणे समोर आली आहे तर १२७रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दक्षिण मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेसमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ताज हॉटेलचे संचलन करणारी इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसी) ने कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची पुष्टी केली. रविवारी राज्यात नवीन १४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या १८९५ झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!