Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect #AurangabadNewsUpdate : तोंडाला मास्क लावला नाही ५०० रुपये दंड , ९१ रुग्ण देखरेखीखाली , १४ एप्रिलपर्यंत ४ तासांचा कडक कर्फ्यू…

Spread the love

औरंगाबाद शहरात तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्तीकडून  महापालिकेने  ५०० रुपयांचा दंड आकाराला असून त्याची पावती सर्वत्र व्हायरल झाली आहे. अशा दंडात्मक कारवाईमुळे तरी नागरिक नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मिनी घाटीत आज १३० रुग्णांची  तपासणी, ६४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह , ९१ रुग्ण देखरेखीखाली 

औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०६ जणांना घरीच अलगीकरणात  राहण्याचा वैद्यकीय सल्ला दिला. एकूण १०२ जणांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले, असे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. काल आणि आजचे मिळून ७६ तपासणी अहवाल अप्राप्त आहेत.  तर ६४ जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत.  आता एकूण १७ कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या  रुग्णांपैकी २३ रुग्णांना त्यांच्यावर पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात  आली आहे.  देखरेखीखाली एकूण ९१ रुग्ण असल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. दरम्यान गेल्या दोन दिवसात घेतलेल्या स्वॅब टेस्ट मधील ३१रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आली  असून वरील सर्व रुग्ण हे घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि कलाग्राम या तिन्ही ठिकाणचे आहेत. ३० मार्च ला दाखल झालेल्या आरेफ काॅलनी आणि एन ४ परिसरातील रुग्णांच्या दुसर्‍या टप्प्यातील टेस्ट उद्या घेतल्या जाणार आहेत असेही डाॅ.कुलकर्णी म्हणाले

१४ एप्रिलच्या रात्री ११ वाजेपर्यंत शहरात रोज रात्री ४ तासांचा कर्फ्यू 

सध्या राज्यात आणि देशभरात सर्वत्र लॉक डाऊन असला तरी औरंगाबादमध्ये नागरिकांना प्रशासनाकडून तास काही त्रास नाही . जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद ठेवण्यावर कुठलेही बंधन नाही नंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दि . १४ एप्रिलपर्यंत रोज रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत चार तासांचा कडक कर्फ्यू लावला असून या वेळेत केवळ वैद्यकीय सिविधा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असून कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. दि . ११ एप्रिल रोजीच पोलीस आयुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यापूर्वी शब्बा -ए -रात आणि गुड फ्रायडे लाही असेच आदेश जरी करण्यात आले होते आता १४ एप्रिल लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले असले तरी सोशल मीडियावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सार्वजनिकरित्या साजरी न करण्याचा निर्णय आंबेडकरी अनुयायांनी घेतला असल्याच्या पोस्ट आधीच व्हायरल झालाय आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!