Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात साधणार जनतेशी संवाद….

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी पाच वाजता राज्याला संबोधित करणार आहेत. राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता ,  त्यांनी स्वतःच पंतप्रधानांकडे लॉकडाऊन वाढविण्याची विनंती केलेली असल्याने याबाबत ते यावेळी  घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आज रात्री देशाला संबोधित करण्याची शक्यता असून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. या अनुशंगाने केंद्र सरकार आणखी दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही सूचना केल्याचे कळते. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज सायंकाळी पाच वाजता राज्याला संबोधित करणार असून यावेळी राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत ते घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!