Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : ओरिसानंतर पंजाबमध्येही वाढणार लॉकडाऊन, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मते कोरोनाचा तिसरा टप्पा सुरु केंद्राकडून मात्र इन्कार…

Spread the love

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी  करण्यात आलेला २१ दिवसांचा देशातील लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर वाढणार की नाही यावर एकीकडे चर्चा सुरू असताना ओडिशानंतर आता पंजाबमध्येही १ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यासंदर्भात पंजाब सरकारकडून ट्विटवर माहिती देण्यात आलीय. ओडिशा सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यात राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी हा १ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकराल यांनी ट्विट करून दिली. पंजाबमधील करोना रुग्णांची संख्या १३२ इतकी झाली आहे. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मते कोरोनाचा तिसरा टप्पा सुरु केंद्राकडून मात्र इन्कार…

पंजाबमध्ये समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. २७ करोना रुग्णांनी कुठलाही प्रवास केलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली. कोरोनाचा तिसरा टप्पा हा समूह संसर्ग म्हणून ओळखला जातो. करोनाचा समूह संसर्ग सुरू झाला असल्याचा पंजाब सरकारचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. देशात अद्याप कुठेही करोनाचा समूह संसर्ग नाही आणि कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रलयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!