Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात, दुचाकीसह ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंंंगाबाद : अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणा-यास अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गजाआड केले. गुटख्याची वाहतूक करणा-याच्या ताब्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटख्याचा साठा व एक दुचाकी असा एकूण  ४० हजार ६५० रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इम्रान शेख सलीम (वय २७, रा.युनूस कॉलनी, रोशनगेट) असे गुटख्याची वाहतूक करणा-याचे नाव आहे. रेल्वेस्टेशन चौकात अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीक्की, प्रशांत अजिंठेकर, वेदांतनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी जी.बी.तडवी, आर.बी.आडे आदी कर्मचारी नाकाबंदी करीत होते. त्यावेळी शेख इम्रान हा दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीआर-४२३४) वर संशयास्पदरित्या फिरतांना दिसून आला. नाकाबंदी करणा-या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी व पोलिसांनी शेख इम्रान याला थांबवून त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता, दुचाकीच्या डिक्कीत हिरा पान मसाला, रॉयल ७१७, तंबाखू आदी आदी गुटख्याचा साठा मिळून आला. पोलिसांनी गुटख्याचा साठा व दुचाकी जप्त केली आहे.

याप्रकरणी शेख इम्रान याच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त उदय वंजारी, सहायक आयुक्त (अन्न) मिलींद शाह, वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेशवर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, प्रशांत अजिंठेकर, पोलिस कर्मचारी जी.बी.तडवी, आर.बी.आडे आदींच्या पथकाने केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!