Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : “हि” बातमी दिव्यांगांपर्यत पोहोचावा…. आणि अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाचे हेल्पलाईन क्रमांक नोंदवून घ्या….

Spread the love

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा दिव्यांग सहायता कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक 0240-2331572/3/4/5 आहे. तरी दिव्यांगांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. जीवनावश्यक वस्तूसाठी संपर्क साधवा. तर औरंगाबाद शहरातील दिव्यांगांनी 8956306007 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या आदेशानुसार संचारबंदी काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तू, आरोग्यविषयक बाबी, भोजन आदी व्यवस्था संबंधित यंत्रणांमार्फत करून घेण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कक्षामार्फत मनपा, नगर परिषद, पंचायत समितींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरजवंत दिव्यांगांना तत्काळ योग्य ती मदत करण्याबाबत सूचना करण्यात येतील, असेही जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाचे हेल्पलाईन क्रमांक जाहीर

कोविड 19च्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत, ते पुढीलप्रमाणे कंसात दिले आहेत.

औरंगाबाद शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेसाठी www.emergency-needs.com संकेतस्थळ उपलब्ध आहे.

महापालिका (8956306007),

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (0240-2950046),

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (0240-2402409 व 2950028),

मेडिकल आपत्कालीन सेवा (0240-2951010 व 2951011),

इतर राज्य अथवा जिल्ह्यातील स्थलांतरित मजूर, कामगार व इतर नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (0240-2331077),

दिव्यांग सहायता कक्ष  (0240-2331572/3/4/5) आणि इतर सर्व संपर्कासाठी (1077) असे हेल्पलाईन क्रमांक आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!