Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : #CoronaEffect : आम्हालाही सोडा , बलात्काराच्या आरोपीचा तुरुंगात उच्छाद, अधिकार्‍याच्या लगावली कानशिलात…

Spread the love

औरंगाबाद -सात वर्षाच्या आत शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्यांना न्यायालयाच्या आदेशाने काही दिवसांकरता मुक्त केले तसे आम्हालाही करा असे म्हणंत बलात्काराच्या गुन्ह्यात हर्सूल कारागृहात असलेल्या कैद्याने तुरुंगातील अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या आरोपीने तुरुंग कर्मचार्‍याच्या हाताला चावा घेतल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल आहे.अशा अनेक कारणांनी तो हर्सूल कारागृहातील अधिकारी कर्मचार्‍यांना त्रस्त करतो आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली.


चरणसिंग सुलावने(३५) रा.खुल्ताबाद असे या कैद्याचे नाव आहे.आॅक्टोबर २०१८ मधे शहानूरवाडीतील सिग्मा हाॅस्पिटल समोरुन पायी जाणार्‍या ओळखीच्या महिलेला कार मधे लिफ्ट देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे.त्याच्या बराकीत असलेल्या नागपूर येथील कैद्याने तुरुंग अधिकार्‍यांकडे आग्रह धरला की,कोरोना विषाणू महामारीमुळे काही कैद्यांना थोड्या दिवसांसाठी मुक्त केले तसे आम्हाला मुक्त करावे.त्यावेळेस सुलावणे याने बेमुदत उपोषण करुया असा सल्ला सहकारी कैद्यांना दिला.हा प्रकार तुरुंगातील अधिकार्‍याच्या कानावर गेल्यावर त्याने जाब विचारताच सुलावणे याने अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली. अधून मधून तो कारागृहातील भिंतीवर डोके आपटून स्वता:ला जखमी करुन घेत असतो.

दोन दिवसांपूर्वीही याच कारणामुळे सुलावणेला घाटी रुग्णालयात चेकअपसाठी नेले होते.चेकअप झाल्यावर रुग्णालयातील नर्सेस ला अअश्लील भाषैत बोलल्यामुळे सोबंत असलेले पोलिस कर्मचारी चिडले होते. त्यातील एका कर्मचार्‍याने सुलावणे ला समज देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हाताला सुलावणे ने चावा घेतला.जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील पिडीतेचा पती हा सुध्दा हर्सूल कारागृहात शिक्षा भोगतोय त्याच्याच बराकीत ठेवण्यात यावे म्हणून सुलावणे ने तुरुंग कर्मचार्‍यांना यथेच्छ शिवीगाळ केली होती. या प्रकाराला कंटाळून हर्सूल कारागृह प्रशासनाने त्याला जून २०१९ मधे जालना पोलिसांच्या हवाली केले होते. त्याठिकाणी सुलावणे याने जालना पोलिस अधिक्षक आणि पोलिस अधिकारी तुरुंगात छळ करत असल्याची तक्रार खंडपीठात केली होती.त्यामुळे सुलावणेला कोर्टाच्या आदेशाने पुन्हा हर्सूल कारागृहात पाठवले.चरणसिंग सुलावणेला हर्सूल कारागृहातील तुरुंग अधिकारी कर्मचारी वैतागले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!