Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdates : १४ एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनवर ११ एप्रिलला ११ वाजता होईल निर्णय , पंतप्रधान मोदी यांची देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सकारात्मक चर्चा….

Spread the love

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहेत. आतापर्यंत देशात 5194 रुग्ण आढळले आहेत, तर 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह उपचारानंतर 401 लोक बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 1018 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 64 लोकांचा मृत्यू झाला आहे.


देशातील २१ दिवसांच्या लॉक डाऊननंतर काय परिस्थिती राहील ? या विषयी सर्वत्र चर्चा सुरु झाली असून त्यावर असे सांगण्यात येत आहे कि , कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेले १३ राज्यांतील ६० जिल्हे १४ एप्रिल नंतरही कमीत कमी दोन आठवड्यांकरता पूर्णत: लॉकडाऊन ठेवावेत, अशीही शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे. १४ एप्रिलनंतर  नंतरही तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मोकळेपणानं फिरू शकाल, अशी शक्यताही सध्या दिसत नाही. राज्यांच्या सीमा मोकळ्या करण्याचा प्रश्नच येत नाही, असं एका सरकारी अधिकाऱ्यानं म्हटलंय. याशिवाय रेल्वे, मेट्रो आणि विमान प्रवासही लवकर सुरू होण्याची चिन्हं नाहीत. मात्र, मेडिकल, किराणा स्टोअर्स यांच्यासोबत काही गरजेच्या गोष्टींची दुकानं सुरू करण्यासाठी सूट मिळू शकते. परंतु, त्यातही करोना हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणं आणि शहरांसाठी वेगळे नियम असतील. दरम्यान याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ एप्रिलला सकाळी ११ वाजता देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला असून या या विषयावरून गंभीर चर्चा केली जात आहे.  देशातील कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त तृणमुल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, डीएमकेचे टीआर वालू, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, वायएसआरचे मिथुन रेड्डी, सपाचे राम गोपाल यादव, जेडीयूचे राजीव रंजन सिंह, एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान, अकाली दलाचे सुखवीर सिंह बादल यांच्यासह अन्य काही नेत्यांशी संवाद साधला.

दरम्यान सध्या, २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची आवश्यकता आहे का? यावर केंद्र सरकार विचार करत आहे. राज्य सरकार आणि तज्ज्ञांकडून केंद्राला तशा अनेक शिफारसी प्राप्त झालेल्या आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि मध्य प्रदेशच्या सर्व सरकारांनी लॉकडाऊन वाढवण्याचं समर्थन केलंय. यावर अंतिम निर्णय १४ एप्रिलपूर्वी काही दिवस अगोदर स्थिती पाहून घेतला जाईल. अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या गंभीर परिणामांवर लक्ष आहेच परंतु, सध्या या धोक्यातून बाहेर पडणं आवश्यक असल्याचं महत्त्वाचं आहे, याची जाणीव सरकारला आहे. ‘करोनाशी लढण्यासाठी मोदी सरकारला पैसा हवा आहे. तसा तो महाराष्ट्रातील ठाकरे सरकारलाही हवा आहे. महाराष्ट्राने हा निधी कसा उभारावा, असा प्रश्न उपस्थित करतानाच, ‘मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यातील २५ टक्के महाराष्ट्राला परत मिळावेत, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. ‘परदेशातील काळा पैसाही या निमित्तानं परत आणा,’ असा चिमटाही शिवसेनेनं भाजपला काढला आहे.

एकीकडे देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे त्यामुळे देशाची अर्धव्यवस्था ठप्प झाली आहे. तर दुसरीकदे , अभूतपूर्व अशा युद्धामुळं खर्च वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं खासदारांचे वेतन, भत्ते कपात सुरू केली आहे. अन्य ठिकाणांहूनही निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केंद्राच्या या प्रयत्नांचं स्वागत करण्यात आलं आहे. त्याचवेळी, राज्यासाठी केंद्राकडं काही मागण्या करतानाच अग्रलेखातून महाराष्ट्र भाजप करत असलेल्या राजकारणावरही बोट ठेवण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!