Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांचेही “पीएमकेअर्स ” वर प्रश्नचिन्ह ….

Spread the love

काँग्रेसच्या नेत्या  सोनिया गांधी यांनी खासदाराच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला समर्थन दिले असले तरी देखील पंतप्रधानांच्या पीएम केअर्स फंडाबाबत मात्र शंका उपस्थित केली आहे. पीएम केअर्स फंडातील रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत वळती करावी असे सोनिया गांधी यांचे म्हणणे आहे. पारदर्शकता आणि विश्वसनीयतेसाठी हे आवश्यक असल्याचे सोनिया गांधी यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांचे हे म्हणणे कोविड-१९ विरुद्धच्या लढाईसाठी देण्यात आलेल्या ५ सूचनांपैकी एक आहे, मात्र सोनियांसह काँग्रेसच्या नेत्यांचा पीएम केअर्स फंडाबाबत आक्षेप आहेत आणि सूचना करण्याच्या निमित्ताने सोनियांनी हा आक्षेप नोंदवला आहे.

विशेष म्हणजे या पूर्वीच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही  पीएम केअर्स फंडाला विरोध दर्शवला आहे. जर अगोदरपासूनच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी असताना पुन्हा पीएम केअर्स फंड तयार करण्याची गरज काय, असा त्यांचा प्रश्न आहे. पंतप्रधानांना नवा धर्मदाय निधी स्थापन करण्याऐवदी पीएमएनआरएफचे नाव बदलून ते पीएम केअर्स फंड असे करायला हवे होते, असे ट्विट करत शशी थरूर यांनी म्हटले आहे. पीएम केअर्स फंडाचे नियम देखील अस्पष्ट असल्याचे थरूर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान पीएमएनआरएफमध्ये अगोदरच २३९९ कोटी रुपये खर्च न करताच पडून असताना ते प्रथम खर्च केले गेले पाहिजेत. आताच नवा मदत निधी उभारून लोकांकडून पैसे मागण्याची काहीही आवश्यकता नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने पीएम केअर्स फंडाची निर्मिती केल्यानंतर एका आठवड्याभरात फंडात ६५०० कोटी रूपयांहून निधी जमा झाला. यात देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते बॉलिवूड स्टार्स, उद्योजक आदिंनी योदगान दिले आहे. या फंडाचा उपयोग करोनाविरोधातील लढाईसाठी करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!