Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Covid-19 #Coronavirus Pandemic #MorningUpdates : एक नजर : गल्ली ते दिल्ली….जाणून घ्या या क्षणाची कोरोनाव्हायरसची स्थिती…

Spread the love

Covid-19 #Coronavirus Pandemic

Last updated Report : April 06 2020 : Time 04.08 AM | source : WorldometerInfo

जगातील कोरोना व्हायरस एकूण रुग्ण : 12 लाख 73 हजार 810  ।  एकूण मृत्यू : 69 हजार 459  । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 2  लाख 64 हजार 761

भारत : कोरोनाव्हायरस एकूण रुग्ण : 4 हजार 289  |एकूण मृत्यू : 118 उपचारानंतर बरे झालेले रुग्ण 328.

भारत सरकारच्या आरोग्य विभागाने सहा एप्रिल 2020 रोजी सकाळी 9 नऊ वाजता दिलेली आकडेवारी.

एकूण कोरोना रुग्णांची संख्या : 4, 067 । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 291 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 109

राज्यनिहाय रुग्णांची संख्या.
आंध्र प्रदेश 226 , मृत्यू 3 ,अंदमान निकोबार 10 , अरुणाचल प्रदेश 1 , आसाम 26,  बिहार 1, चंदीगड 18,  छत्तीसगड 9 , दिल्ली 50, मृत्यू 3 ,गोवा 7 ,  गुजरात 122 मृत्यू 11 हरियाणा 84 मृत्यू 1 , हिमाचल प्रदेश 13 , मृत्यू 1 , जम्मू अँड काश्मीर 106 मृत्यू 2,  झारखंड 3 , कर्नाटक 151 , मृत्यू  4 , केरला 314 मृत्यू 2 , लडाख 14,  मध्य प्रदेश 165 मृत्यू 9,  महाराष्ट्र 690 मृत्यू 45,  मनिपुर 2, मिझोराम १,  ओडिसा 21,  पांडेचेरी 5, पंजाब 68 मृत्यू ६,  राजस्थान 253, तामिळनाडू 571 मृत्यू 5 तेलंगणा 321 मृत्यू 7,  उत्तराखंड 26,  उत्तर प्रदेश 227 मृत्यू 2 , पश्चिम बंगाल 80 मृत्यू 3 एकूण रुग्णांची संख्या 4067 मृत्यू  109 , उपचारांनंतर बरे झालेले रुग्ण 292.

औरंगाबाद: घाटीतील अपघात विभागामध्ये कार्यरत कर्मचारी बाधित, औरंगाबाद जिल्ह्यातील बाधितांची संख्या 11 वर

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितचा पहिला बळी; कॅलिफाेर्नियावरून आलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू

भाजप महिला अध्यक्षाने केला कोरोनावर फायर …!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी रात्री ९ वाजून ९ मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला होता त्याचे पालन करताना  बलरामपूर इथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी कोरोनाला पळवण्याासाठी रिवॉल्वरमधून हवेत गोळीबार केला आहे. त्यांनी हा गोळीबार करण्याचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला पण देशभर हि बातमी व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ आता डिलीट केला आहे.

पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानुसार मंजू तिवारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिवे लावून झाल्यानंतर मंजू तिवारी यांनी कोरोनाला पऴवण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि त्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला.  उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथे घडली आहे. त्यांच्या या व्हिडीओला 224 लाईक्स आणि 66 कमेंट्स आल्या होत्या . त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्यांची हि कृती बातमीचा विषय झाल्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ काढून टाकला आहे.  छायाचित्रात त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी त्यांच्या पतीच्या हातात रिव्हॉल्वर दिसत आहे. कोरोनावर अशा पद्धतीने गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्ष आणि पोलीस काही कारवाई करणार का ? याची चर्चा आता सुरु झाली आहे.

कनिका कपूरला रुग्णालयातून सुट्टी 

कोरोना आणि अनेक पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चर्चेत आलेल्या कनिका कपूरची टेस्ट आता पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

भाजप हाच भारतीय लोकशाहीचा खरा वाहक पक्ष असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. 

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४,०६७ वर पोहोचली. गेल्या २४ तासांमध्ये ६९३ नवे रुग्ण आढळले.

मध्य प्रदेश: भोपाळमध्ये करोनाचा पहिला बळी, एका ६२ वर्षीय व्यक्तीचा रात्री उशिरा झाला मृत्यू. या बरोबर मध्य प्रदेशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोहोचली १४ वर.

उत्तर प्रदेशात १६ नवे करोनाग्रस्त आढळले. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज दुपारी १२.३० वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बैठक.

भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन. सोशल डिस्टंसिंगसह गरजवंताना कार्यकर्त्यांनी मदत करावी- पंतप्रधान मोदी.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!