Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdates : ऐकावे ते नवलच !! २२ हजार महिला विधवा होण्याची भीती पसरविणारे मॅसेज व्हायरल केले , दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल !!

Spread the love

देशभरात आणि राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा पसरविण्यात येत असून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी अनेक शहरात अफवा चालूच असून कोल्हापुरात तर समाजात अफवा  पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याबरोबरच तीळ अनेक वर्गात भीती पसरविणारे  मेसेज व्हायरल करणाऱ्या एकूण आठ जणांवर जिल्ह्यातील विविध ५ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे त्यात दोन महिलांचाही  समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटल्याचा वायरल मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या दोन महिलांविरोधात जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर देखील जातीय तेढ निर्माण करणारा मेसेज सोशल मीडिया पाठवल्याबद्दल तर तबलिगी प्रकरणावरून मुस्लिम समाजाच्या भावना भडकावणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दल अशीच एक अफवा पसरली आहे.

२२ हजार महिला विधवा होणार

‘अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं असून त्या मंगळसूत्रातील २२ हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे २२ हजार महिला विधवा होणार आहेत. मात्र त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे महिलांनी एक दोरा घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितला आहे.’ अशा अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

या बद्दल बोलताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले  की, शुक्रवारपासून सोशल मीडियातून ही अंबाबाईबद्दल अफवा पसरवली जात आहे. याबाबत सातत्याने कोल्हापूर व अन्य ठिकाणच्या भाविकांकडून विचारणा होऊ लागली आहे. वस्तूस्थिती अशी की, अंबाबाईचं नित्य वापरातील सोन्याचं मंगळसूत्र व सौभाग्य अलंका सुस्थितीत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूरच्या मंदिरात कधीच गाऱ्हाणं घातलं जात नाही. तरीही या संदेशात पुजाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या संदेशामुळे आधीच कोरोनामुळे भयग्रस्त नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे. दरम्यान, हा संदेश ज्या कुणी तयार करुन सोशल मीडियात पसरवला आहे. त्यांनी हेतू पुरस्तर समाजात भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात केली होती. या मागणीची पोलिसांनी आता दखल घेतली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!