Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….

Spread the love

जगभर कोरोनाची दहशत असून करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना घडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊन दरम्यान एका घराबाहेर गोंधळ करणाऱ्या पाचजणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. गोळीबार करणारा आरोपी स्वत: एका रुग्णालयात काम करत असून त्याची पत्नी डॉक्टर आहे. करोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी रशियन सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गोळीबाराची ही घटना मॉस्कोच्या रयाजान भागात घडली. आरोपी एन्टन फ्रांचिकोव (३१) याने आपल्या बाल्कनीतून गोंधळ करणाऱ्या लोकांना दम दिला. त्यानंतरही हा गोंधळ, आवाज सुरू असल्यामुळे त्याने शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रायफलने पाच जणांची गोळी मारून हत्या केली. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून ती गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान आरोपीने तीन जणांची बाल्कनीतून गोळ्या झाडून हत्या केली. अन्य दोघेजण त्याच इमारतीत लपून बसले होते. त्यांनाही गोळ्या झाडून त्याने ठार मारले. रस्त्यावर गोंधळ सुरू असल्यामुळे आरोपी एन्टनचा लहान मुलगा झोपेतून सारखा उठत होता. त्याशिवाय सगळ्यांनाच घरातच थांबण्याचे आदेश सरकारने दिले असताना काही जण रस्त्यावर फिरत होते असा बचाव करण्याचा प्रयत्न त्याने केला असल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी याचा इन्कार केला. शेजाऱ्यांमधील भांडणे विकोपाला गेली असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी फ्रांचिकोवने गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पकडले. आरोपीविरोधात यापूर्वीही  घरगुती हिंसाचार अथवा अन्य काही गुन्हे दाखल झाले होते का याची माहिती पोलीस घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!