Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने मुंबईकरांची चिंताही वाढली !! २४ तासात ८ बळी ….

Spread the love

देशभरात कोरोना बाधितांचा एकदा वेधत असतानाच राज्यातील  कोरोनाबाधितांची संख्या आता ७४८  झाली आहे. तर मृतांचा आकडा ४५ वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबईत ३० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबई शहराची इतर राज्यांशी तुलना केल्यास ही संख्या खूप जास्त आहे. सध्या मुंबईत एकूण ४५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यात नवी मुंबईत कोरोनामुळे ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे, नवी मुंबईत मृतांचा आकडा आता २ झाला आहे. एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मृत नागरिक नेरुळ येथे राहणारा असून तो पॉझिटिव्ह होता. तसेच नवी मुंबईत रविवारी दिवसभरात आणखी ३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २८ वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे घणसोलीत एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. घणसोली १, नेरुळ २ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

दरम्यान मुंबईत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या तीन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची तपासणी केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमधील ६ जणांना दीर्घकालीन आजार होता. तर यापैकी २ जणं वृद्ध होते. आज मृत्यू झालेल्यांमध्ये ७ जण हे पुरुष असून १ महिला होती. यांचे वय ५० ते ८० या दरम्यान असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.ऑसध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३००० च्या पार गेला असून ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीत ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धारावी या भागात तब्बल ७ ते ८ लाख नागरिक राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा फैलाव जलद गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितले असले तरी रुग्णांची संख्या कमी न झाल्यास ही मर्यादा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील निजामुद्दीन जमात या कार्यक्रमातील अनेक सदस्यांनी मुंबईतील धारावीत वास्तव्य केल्याचे समोर आल्यानंतर भीती वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!