Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…

Spread the love

देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणं आखणं गरजेचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयांसह तयार रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी प्रमुख विरोधी नेत्यांशीही चर्चा केल्याचे वृत्त आहे त्यामुळे ते आणखी काय मोठे निर्णय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान केंद्र सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांची ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची  माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. तूर्तास १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. करोनाशी लढता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय झाला असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या देशावर आलेलं करोनाचं संकट हे खूप मोठं आहे. त्यामुळे या संकटाशी सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. याच विषयावर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. देशभरातली करोनाग्रस्तांची संख्या ४ हजाराच्या वर गेली आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्यानंतर काय केलं जाणार? यासंदर्भात प्रश्न विचारला असता प्रकाश जावडेकर यांनी यावरही उत्तर दिलं. प्रकाश जावडेकर म्हणाले की जगभरातल्या करोनाच्या फैलावाचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स आपण घेत आहोत. भारतात काय उपाय योजायचे हे त्या त्या वेळी ठरवलं जाईल. तूर्तास लॉकडाउननंतर काय निर्णय घ्यायचा याची चर्चा बैठकीत झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!