Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaUpdate : पुणे विभागातील “त्या ” २२ बेपत्ता संशयितांचा घेतला जातोय शोध ….

Spread the love

दिल्लीत निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील नागरिकांची संख्या ३४४ झाली आहे. त्यापैकी २२ जणांचा शोध लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. २२ जणांचा शोध न लागल्यानं ते नेमके कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील २५८ नागरिकांची यादी शुक्रवारी प्राप्त झाली होती. त्यामध्ये ८६ जणांची भर पडली आहे. आता ३४४ जण झाले आहेत. शुक्रवारी १६३ नागरिकांना ‘क्वारंटाइन’ करण्यात होते. आता आणखी ५० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान या नागरिकांपैकी चार नागरिक हे करोनाबाधित असल्याचे शुक्रवारी आढळून आले होते. याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसार माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘निजामुद्दीन येथे झालेल्या मेळाव्याला गेलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. आतापर्यंत ३४४ नागरिकांची यादी मिळाली आहे. शनिवारी ५० जणांना क्वारंटाइन करण्यात आले. या यादीतील ३१ जण हे विभागाबाहेरील असून, ४८ जण हे राज्याबाहेरील आहेत. २२ जणांचा अद्याप शोध घेण्यात आलेला नाही. या यादीतील काही नागरिक हे प्रत्यक्ष मेळाव्यात सहभागी झाले होते, तर काहीजण हे त्या परिसरात आढळून आले आहेत.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!