Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Corona Virus Effect : औरंगाबाद : रुग्ण आढळलेला परिसर केला बंदिस्त , जिल्हाधिकारी कार्यालयातील चालकालाही कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण…

Spread the love

औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त झालेले एकूण ७  रुग्ण आढळून आल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. या नवीन सात रुग्णांमध्य सिडको एन-4 येथील एक, सातारा परिसर एक, देवळाई परिसर एक, जलाल कॉलोनी येथे दोन, अहबाब कॉलोनी येथे एक आणि पदमपुरा येथे एक अशे एकूण ७ कोरोना ग्रस्त रुग्ण आढळुन आले आहे. वर नमूद रुग्णांचे संपर्कात आलेले लोकांचे लाळेचे  नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ पाडळकर यांनी दिली. दरम्यान आज असे  किमान १०० नमुने तपासणी पाठविण्यात आले असून रुग्णांचे संपर्कात आलेले प्रत्यक व्यक्तीला ट्रेस करण्याचे काम सुरू आहे.तसेच बाधित रुग्णांचे घर व आसपासचा परिसर सील करण्यात आला आहे. वर नमूद रुग्णांमध्ये एका रुग्णांचे निधन झाल्याची बातमी आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चालकालाही करोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातवरण निर्माण झालं आहे.

दरम्यान जलाल कॉलोनी येथे आढळून आलेला एक रुग्ण आदी रेहमानिया कॉलोनी येथे राहत होता नंतर तो त्याच्या मुलाकडे जलाल कॉलोनी येथे राहायला गेला. या मुळे रेहमनिया कॉलोनी, किराडपुरा येथे त्याचा घर व आसपासचा परिसर सील करण्यात आला आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवस आधी या व्यक्तीच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते ५८ वर्षाचे होते आणि घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. ते डायबिटीस आणि हायपर टेन्शनचे देखील रुग्ण होते. त्यांना  ” सारी” रोगाचीही लागण झाली होती .  दरम्यान तपासणी अहवालात त्यांना कोरोना असल्याचेही स्पष्ट झाले  आहे. सारी रोगाचा अजून एक रुग्ण सद्ध्या घाटीत आहे. अहबाब कॉलोनी येथील आढळून आलेला रुग्णाचा प्रवास इतिहास प्रमाणे तो जॉर्डन या देशात जाऊन आलेला आहे आणि तो कलाग्राम येथे अलगीकृत होता, अशी माहिती डॉ पाडळकर यांनी दिली.  आजचे  ०७  आणि ०३  अशा मिळून शहरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० झाली आहे. याच्यात सिडको एन-1 चया बऱ्या झालेली महिला रुग्णांचा देखील समावेश आहे.

औरंगाबादमध्ये आज  उघडकीस आलेले पाचही जण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चालकालाही करोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातवरण निर्माण झालं आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल दोन करोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा कळविण्यात आले. त्यात ४५ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरुष ( राहणार अनुक्रमे – आरेफ कॉलनी आणि बीड बाय पास) यांचा समावेश आहे. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एका खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी  दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!