Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Aurangabad Crime : संचारबंदीचे उल्लंघन करणा-या २९ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

संचारबंदीचे उल्लंघन करणा-या २९ जणांविरूध्द गुन्हा दाखल
संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणा-या २९ जणांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सिडको-४, जिन्सी-३,सिटीचौक-३, क्रांतीचौक-२,सातारा-२,जवाहरनगर-२, तर बेगमपुरा, दौलताबाद,एमआयडीसी सिडको,हर्सुल पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे एवूâण २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ट्रकमधुन प्रवासी वाहतूक करणा-याविरूध्द गुन्हा दाखल
प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असतांना देखील जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाNया ट्रकमधून प्रवाशांची वाहतूक करणाNया वसीम खान हारूण खान (वय ३४,रा. उमर स्टेट, ता.जामनेर,जि.जळगांव) याच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचालक वसीम खान हा ट्रक क्रमांक (एमएच-४१-जी-६७३२) मधुन प्रवाशांची वाहतूक करीत होता. वसीम खान याचा ट्रक गोलवाडी येथील चेकपोस्टवर थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता, ट्रकमध्ये १६ प्रवासी दाटीवाटीने बसून असल्याचे निदर्शनास आले होते.

क्षुल्लक कारणावरून मजूरास मारहाण
माझा मोबाईल का घेतला असे म्हणत एकाने तौफीक ईस्माईल शहा (वय २७, रा.सहीदा कॉलनी, पुâलेनगर, हर्सुल) या सेंट्रींग काम करणाNया मजूरास शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीची तोडफोड करून ५ हजाराचे नुकसान केले. ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बायजीपुरा गल्ली नंबर १२ येथे घडली. याप्रकरणी बागवान (रा.बायजीपुरा) याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डोंबाळे करीत आहेत.

दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू
एमआयडीसी वाळुज परिसरातील सिडको गार्डनजवळ दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या सरीता संजय सातदिवे (वय २१, रा.पंढरपूर, वाळुज) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरीता सातदिवे या शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून पडून जखमी झाल्या होत्या. सरीता सातदिवे यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी (दि.५) सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!