Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : धक्कादायक : १० लाख लोकसंख्येवर फक्त २९ चाचण्या का केल्या जात आहेत ? : राहुल गांधी यांनी उपस्थित केला प्रश्न !!

Spread the love

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत  प्रश्नचिन्ह उपस्थित करून हल्लाबोल केला आहे. टाळ्या वाजवून, दिवे आणि टॉर्च पेटवून करोना पळणार नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विटमधून म्हटले आहे. करोनाचा सामना करण्यासाठी देशात पुरेशा चाचण्या केल्या जात नसल्याचा आरोप करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि , नागरिकांना टाळ्या वाजवण्याचे  आणि दिवे लावण्याचे  आवाहन करून करोनाचे संकट दूर होणार नाहीए.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केले  होते . यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या सर्व कर्मचारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी मोदींनी हे आवाहन केलं होतं. यानंतर उद्या रात्री म्हणजे ५ एप्रिलला ९ वाजात ९ मिनिटं घरातील लाइट बंद करून नागरिकांनी मेणबत्ती, मोबाइलचा प्लॅश लाइट, टॉर्च किंवा दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. भारतात करोना चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाहीत . १० लाख लोकसंख्येच्या तुलनेत होणाऱ्या चाचण्या या अतिशय कमी प्रमाणात आहेत. भारतात इतक्या कमी चाचण्या का केल्या जात आहेत? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!