Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : कोरोनाला अजूनही थट्टा -मस्करीने घेताय ? मग वाचाच हे काय घडले ? अशी वेळ कुणावरही येऊ नये !!!!

Spread the love

भारतात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग  रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार घराबाहेर पडू नये असे  आवाहन केले जात आहे. मात्र सरकारचे  हे आवाहन नागरिक अद्याप गांभीर्याने न घेता थट्टा -मस्करीत घेण्याचा पयतन करताना दिसत आहेत. दरम्यान हा संसर्ग जीवघेणा आणि किती भयानक आहे याची जाणीव अजून लोकांना झाली नाही. विशेष म्हणजे या व्हायरसमुळे ती व्यक्ती केवळ आपला जीव गमावत नाही तर संसर्ग झाल्यानंतरही कुटुंबास त्याचा चेहरा पाहता येत नाही. पानिपत इथेही असााच प्रकार घडला. वडिलांना आपल्या धाकट्या मुलाला शेवट्या श्वासापर्यंत मिठीही मारता आली नाही. या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांना त्याला शेवटचं जवळ घेता आलं नसल्याचं वृत्त आहे.

दरम्यान यापूर्वीही कोरोनामुळे किंवा कोरोनाच्या संशयावरून जे जे मृत्यू झाले आहेत ते अतिशय भयानक आहे. मुळात ज्यांच्या घरातील हा रुग्ण होता बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना केवळ काचेतून पाहून अंत्यदर्शन चेहरा पाहण्याचा विषयच येत नाही.  या प्रकरणातही असेच झाले . मुलाच्या मृत्यूमुळे वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता पण  कोरोनाची भीती एवढी होती की वडिलांनी मुलाला खांदा देण्यासाठी लोकांना पैसे देऊन बोलवलं तरी यायला नकार देत होते. वडिलांना मुलाच्या पार्थिवाजवळ जाण्याआधी डॉक्टरांनी त्यांना कोरोना किट घालण्यासाठी दिलं. त्यानंतर वडिलांनी स्वतःच मुलाचं पार्थिव उचलून गाडीत ठेवलं. पोलीस किंवा रुग्णालयातील स्टाफही मदतीला येण्यासाठी तयार नव्हता.

दरम्यान पार्थिव रुग्णवाहिकेतून आणण्यात आले त्यावेळी चितेवर ठेवण्यासाठीही त्याला कुणीच मदत केली नाही. वडिलांनी मोठ्या भावाच्या मदतीनं पार्थिव स्ट्रेचरवरून चितेवर नेऊन ठेवलं. पार्थिव नेत असताना वडिलांचे हात थरथर होते त्यामुळे पार्थिव खाली पडले  मात्र पोलीस आणि रुग्णवाहिकेतील लोक संसर्गाच्या भीतीने  पुढे सरसावले नाहीत. अखेर वडिलांनीच पार्थिव चितेवर ठेवलं आणि मोठ्या भावानं मुखाग्नी दिला. अशा परिस्थिती कुणावरच येऊ नये असं वडिलांनी प्रार्थना केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर वडील आणि मोठ्या भावाला २४ तासांसाठी घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यानंतर या दोघांचीही चाचणी करण्यात आली ती निगेटिव्ह आली आहे. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी एकही नातेवाईक आला नाही ना कुणी मदत केली. कोरोनाच्या भीतीनं तर शेवटचं घट्ट जवळही घेता न आल्याचं दु:ख वडिलांनी व्यक्त केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!