Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad CoronaUpdate : सिडको एन ४ मधील ४ वसाहतीतील ३० जणांचे “स्वॅब”चे नुमेने घेतले

Spread the love

औरंगाबाद – काल गुरुवारी शहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण सापडल्यानंतर एकाच खळबळ उडाली होती , दरम्यान यापैकी एन ४ सिडको परिसरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्या नंतर प्रशासन हादरुन गेले. ३० जणांचे स्वॅबचे नमुने घेतले असून येत्या दोन दिवसात त्याचा अहवाल मिळेल अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यअधिकारी डाॅ.निता पाडळकर यांनी दिली.
पुंडलिकनगर पोलिसांनी चारही वसाहती चारही बाजूनीं सील केल्याआहेत.आज सकाळी(३/०४) १०.३०वा. पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी या भागाची पाहणी केल्याची माहिती एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी दिली.कामगार चौक ते गजानन काॅलनीतील नागरिकांना प्रसाद यांनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच या भागातील नागरिकांना त्या भागातील नगरसेवकाच्या मदतीने सर्व आवश्यक वस्तू घरपोच देण्यात येत आहेत. त्यासाठी एक व्हाॅट्सअॅपग्रुपही तयार करण्यात आल्याचे एपीआय सोनवणे म्हणाले.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या १८ जणांवर गुन्हे दाखल

औरंंंगाबाद : संचारबंदी लागू असतांनाही मुक्तपणे फिरणा-यावर पोलिसांनी थेट कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या १८ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र  शासनाने २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर राज्य शासनाने १४ एप्रिल पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून फिरणा-याविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात १८ जणांविरूध्द १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात एमआयडीसी सिडको-३, हर्सुल-२, उस्मानपुरा-२, वेदांतनगर, सिडको, सिटीचौक, बेगमपुरा पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!