Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusLatestUpdate : जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान, मृत्यू दर १४ टक्केवरून १९ टक्केवर, युरोपची परिस्थिती चिंताजनक

Spread the love

जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. ताज्या आकडेवारी नुसार कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ७,८६,५४१ इतकी  झाली असून कोरोनामुळे ३७, ८३१  जणांचा मृत्यू झाला आहे तर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,६५,६६१ इतकी आहे. गेल्या काही दिवसातच कोरोनाचा मृत्यू दर १४ टक्केवरून १९ टक्के पर्यंत वाढला आहे. दरम्यान करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे युरोपीयन देशांसह अमेरिकेत वेगाने कोरोनाचा फैलाव होत असलयाने अमेरिकाही चिंतीत आहे . कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका हा मध्यम वयोगटानंतर २१ ते ३० वयोगटाला असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २०३ रुग्णांपैकी या वयोगटातील ४४ तरुणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर ३१ ते ४० या वयोगटामधील ४३ तर ४१ ते ५० वयोगटातील ३८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट झाली आहे. सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या या करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे, त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ करोनाबाधित आढळून आले आहेत. वसई आणि ठाण्यात प्रत्येकी पाच तर कल्याणमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, यवतमाळमध्ये प्रत्येकी चार तर अहमदनगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नोंदवलेल्या आकडेवारीमध्ये ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के स्त्रियांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

संसर्ग झालेल्या करोनाच्या रुग्णांमध्ये ३५ टक्के हे संसर्गित देशातून आलेले प्रवासी आहेत. तर संपर्कामध्ये आलेल्याचे प्रमाण २९ टक्के आहे, ३१ टक्के व्यक्तींचे अहवाल अद्याप आलेले नसून, ५ टक्के व्यक्तींमध्ये अद्याप करोनासंदर्भातील अंतिम निष्कर्ष काढता आलेला नाही. आतापर्यंत राज्यात करण्यात आलेल्या निदान चाचण्यांपैकी चार टक्के चाचण्यांचे निष्कर्ष हे निगेटिव्ह आलेले आहेत. कोव्हिडमुक्त झालेल्या चार टक्के रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. मृत्यूचे प्रमाण हे ६१ ते ७० या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे चार टक्के इतके आहे. तर ४१ ते ५० या वयोगटामध्ये ते २ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. ८१ ते ९० वर्ष वयोगटामध्ये मृत्यूचे प्रमाण १ टक्का आहे. एक ते चाळीस वर्षे वयोगटामध्ये राज्यात एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. करोना संसर्गाच्या २१व्या दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. चौथ्या दिवशी एकही रुग्ण सापडला नव्हता, आठव्या दिवशी ही संख्या एक होती. तर अठराव्या दिवशी दोन रुग्ण सापडले होते. तिसऱ्या, पाचव्या, १७व्या दिवशी प्रत्येकी अकरा आणि पंधरा रुग्णांची नोंद झाली होती. २१व्या दिवशी २७ तर २२व्या दिवशी २२ रुग्णांची नोंद झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!