Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना “पीएम केअर्स ” फंड कशासाठी ?

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना PM Cares नावाने फंड काढण्याची गरजच काय? असा प्रश्न इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विट करुन हा प्रश्न विचारला आहे.आपल्या देशावर राष्ट्रीय संकट आहे. अशात पंतप्रधान स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही या PM Cares बद्दल पंतप्रधान कार्यालयाला प्रश्न विचारले आहेत.

दरम्यान देशभरात करोनाग्रस्तांची संख्या १२०० च्या वर पोहचली आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद करण्यात आलं आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशात पंतप्रधान निधीसाठी मदत करणाऱ्या दानशूर लोकांचीही संख्या वाढते आहे. मात्र यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी असताना पीएम केअर या नावाने नवा फंड उभारण्याची गरजच काय? असा प्रश्न रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफचे नामकरण पीएम केअर्स असे करावे असा खोचक सल्लाही शशी थरुर यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांना नावं बदलण्याची सवय आहे त्याप्रमाणेच हे नावही बदलावे असंही थरुर यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!