Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : गांधीनगरातून एका कुटुंबियासह दोघे ताब्यात, १४ लोक होम क्वारंटाईन, महापालिका उद्या करणार खात्री, पोलिसांनी दिली होती २९ संशयितांची यादी

Spread the love

दिल्ली येथे इज्तेमा आणि लग्नासाठी गेलेल्या दोघांसह एका कुटुंबाला क्रांतीचौक पोलीसांनी ताब्यात घेत महापालिका आरोग्यविभागाला कळवले. डाॅ.निता पाडळकर यांनी वरील १४जणांची चौकशी केली.त्यांनी जिल्हा रुग्णालयातून या पूर्वीच तपासणी केली आहे.व ते सर्व जण होमक्वारंटाईन आहेत.उद्या पुन्हा सथर्कता म्हणून आपण वरील १४नागरिकांच्या संपूर्ण टेस्ट करुन अहवाल देणार आहोत.असे डाॅ पाडळकर म्हणाल्या.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली येथील निझामुद्यीन येथील मरकज मध्ये १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. जमातमध्ये गेलेले तेलंगणा येथील सहा जणांचा कोरोनाने मुत्यू झाल्याने देशभरात सतर्वâतेचे आदेश देण्यात आले. यावरून प्रशासनाने जमातमध्ये गेलेल्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली.

औरंगाबादमध्ये  तीन जण हे नुकतेच दिल्ली येथुन परतल्याचे कळताच क्रांतीचौक पोलीसांनी गांधीनगरातुन एका ६५ वर्षीय इसमासह १८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. तर त्याच परिसरातील कुटुंबिय नातेवाईकांच्या लग्नासाठी दिल्ली येथे गेले होते. एक महिन्यानंतर हे कुटुंबिय चार दिवसापुर्वी औरंगाबाद शहरात परतले.

कोरोनाची लागण झाल्याचा संशयावरून पोलीसांनी त्यांना आज दुपारी ताब्यात घेत एका रुग्णवाहिकेतून महापालिका आरोग्य विभागाकडे पाठवले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!