Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : भारताविषयी शास्त्रज्ञ म्हणतात २१ दिवसात नाही तर ४९ दिवसात पडू शकतो फरक !!

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केल्यानंतर नेमक्या किती दिवसात परिस्थिती आटोक्यात येईल याचे उत्तर मिळत नसले तरी कोरोनामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळं २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. असे असले तरी, भारतील परिस्थिती सुधारण्यासाठी २१ दिवसांचा नाही तर ४९ दिवसांचा लॉकडाऊन असावा असे केंब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या संशोधकांनी एका संशोधनात म्हटले आहे.

या संशोधनात ४९ दिवस संपूर्ण राष्ट्रव्यापी लॉकडाऊन किंवा नियमितपणे दोन महिन्यांत काही दिवसांची विश्रांती त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन आवश्यक आहे. कोरोनाला भारतात पुन्हा उठण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘इज स्ट्रक्चर्ड इम्पॅक्ट ऑफ सोशल डिस्टॅन्सिंग ऑन कोविड-19 एपिडिमिक इन इंडिया’ या शीर्षकाने एक अहवाल जारी करण्यात आला. याच गणिताचे एक मॉडेल देण्यात आले आहे. यामध्ये भारतातील लोकसंख्येचे वय आणि सामाजिक संपर्क रचना यांचा समावेश आहे. या अहवालात कोरोना रोखण्यासाठी सामाजिक अंतर सर्वात महत्वाचे आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे २१  नाही तर ४९  दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे.

या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा इलाज मिळालेला नाही आहे. त्यामुळे सध्या, सामाजिक अंतर (Social Distancing) खूप महत्वाचे आहे. त्यामुळेच भारतातील शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि ऑफिस बंद करण्यात आले आहे. राज्यात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१५ वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी १२ नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. पुण्यात ५, मुंबई ३, नागपूर २, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शनिवारपर्यंत २०३ रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत आणखी ०५ रुग्णांचा समावेश झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!