#CoronaVirusUpdate : चर्चेतली बातमी : चीनमध्ये कोरोनामुळे नेमके मृत्यू झाले किती ? अस्थिकलशामुळे उघड होतेय धाकदायक माहिती….

Advertisements
Advertisements
Spread the love

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या  संसर्गाने त्रस्त झाले असून या विषयी चीनच्या संदर्भात अनेक बातम्या येत असून कोरोनाचे  केंद्र असणाऱ्या वुहानमध्ये नेमका  किती जणांचा मृत्यू झाला आहे, याबाबत जगभर प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत प्रसिद्ध होत असलेल्या  माहितीनुसार,  कोरोनामुळे चीन मध्ये सुमारे ४२ हजारजणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान चीन सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मात्र  वुहानमध्ये करोनाच्या संसर्गाने जवळपास ३२०० जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. याबाबत, डेली मेलने वुहानमधील स्थानिकांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. चीनच्या हुबेई प्रातांची राजधानी असणाऱ्या वुहान शहरातील बाजारपेठेतून सुरू झालेल्या करोना व्हायरसच्या संसर्गाने संपूर्ण चीनमध्ये ३३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८१ हजारजणांना संसर्ग झाला आहे. यामध्ये ३१८२ जणांचा मृत्यू हुबेई प्रांतात झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिदिन ५०० जणांचा अस्थि कलश मृतांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येत आहे.

Advertisements

वेगवेगळ्या सात स्मशानभूमी स्थळावरून अस्थिकलश सोपवण्यात येत आहेत. त्यानुसार मागील २४ तासांत ३५०० जणांचे अस्थिकलश त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. हंकोऊ, वुचांग आणि हनयांगमध्ये ५ एप्रिलपर्यंत अस्थि कलश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी १२ दिवसांत ४२ हजार अस्थिकलश देण्यात येणार आहेत. त्याआधी एका वृत्तानुसार हंकोऊमध्ये दोन वेळेस ५००० मृतांचे अस्थिकलश देण्यात आले होते. या दिवशी किंग मिंग हा उत्सव सुरू होतो. यामध्ये नागरीक आपल्या दिवंगत पूर्वजांना आदरांजली वाहतात. मागील दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यातही ज्यांच्याकडे ग्रीन हेल्थ प्रमाणपत्र आहेत, असे नागरीकच घराबाहेर पडू शकणार आहेत.

Advertisements
Advertisements

वुहान येथील नागरीक झांग यांनी सांगितले की, सरकारने मृतांचा दिलेला आकडा योग्य नाही. स्मशानभूमीत अंतिम संस्कार करणारे २४ तास काम करत आहेत. जर, कमीजणांचा मृत्यू झाला असेल तर २४ तास का काम करावे लागत असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर, सरकार जाणूनबुजून मृतांचा आकडा टप्प्याटप्प्याने जाहीर करत आहे. त्यामुळे लोकांना वास्तविकता स्वीकारणे जड जाणार नाही असेही एका स्थानिक नागरिकाने म्हटले असल्याचे डेली मेलने म्हटले आहे. हुबेई प्रांतातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकजणांचा आजारपणामुळे घरातच मृत्यू झाला आहे. मात्र, त्याची माहिती सरकारला देण्यात आली नसल्याचे सांगितले. एका महिन्यात २८ हजार जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. त्यामुळे चीनकडून मृतांच्या आकडेवारीबाबतही लपवाछपवी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आपलं सरकार