#CoronaVirusEffect : Latest Update : राज्यात २१५ तर देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०२४ वर , पुण्यात पहिला बळी…

Advertisements
Advertisements
Spread the love

देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरु असतानाही राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून आज आणखी १५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पुण्यातील तब्बल पाच जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे. दरम्यान पुण्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात ५२ वर्षाच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरांत करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. वरळी कोळीवाड्यात करोनाचे संशयित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली असून, पोलिसांनी खबरदारी म्हणून हा परिसर सील केला आहे. तसंच महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

Advertisements

पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १०२४ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील ९ मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. दरम्यान आतापर्यंत ९६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत १०६ नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 96 जणांनी हा यशस्वी लढा दिल्यानं दिलासा व्यक्त केला जात आहे. भारतात कोरोनाची वाढणारी संख्या लक्षात घेता 14 एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन वाढणार का अशी एका भीतीही व्यक्त केली जात आहे. भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारपर्यंत १५५ कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आहे. मुंबईतील १४, पुण्यातील १५, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण ३४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

राज्यात आज वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील पाच, मुंबईतील तीन, नागपूरमधील दोन तसंच, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान उपचारानंतर बऱ्या झालेल्या व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. या सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  करोनाचा तिसरा टप्पा अत्यंत घातक मानला जात आहे. या टप्प्यात करोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीनं वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं. मात्र, राज्यानं या टप्प्यात प्रवेश करू नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस व सर्व प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शरद पवार यांनीही आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं आहे. आम्हीही घरात आहोत. तुम्हीही घरातच थांबा, असं त्यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार