Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : महाराष्ट्र माझा : राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांसाठी उभारले २६२ मदत केंद्र : उद्धव ठाकरे

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करताच  प्रत्येक राज्यातील मजूर , कामगार , शोषित घटकातील लोक भयभीत झाले आहेत. डोक्यावर संसार आणि कडेवर , हातात मुले घेऊन हे लोक आपल्या कुटुंबियांसह आपापल्या गावाकडे निघाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती . यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकांना आहात तेथेच थांबा अशा सूचना दिल्या होत्या. आणि प्रत्येक राज्यांना त्यांची खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते . या पार्श्वभूमीवर राज्य  सरकारने  या बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरात त्यांच्यासाठी २६२ मदत केंद्रे उभारली आहेत. तर ७० हजारांहून अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे.

या  संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनामुळं मृतांची संख्या आणि करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या जीवघेण्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक निर्बंध उपाय करत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील कामगार, मजूर आणि बेघरांना स्थलांतर करण्यापासून रोखले जात आहे. ही कठोर पावलं उचलतानाच, राज्य सरकारनं या बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं या बेघर लोकांसाठी २६२ मदत केंद्रे उभारली आहेत. या माध्यमातून ७० हजार ३९९ लोकांसाठी निवारा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली जात आहे. करोना संकटामुळं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या परिस्थितीत राज्याबाहेरील व स्थलांतरित कामगार / बेघर अशा ७०,३९९ लोकांना अन्न आणि आश्रयासाठी ही केंद्रे उपलब्ध करून देत आहे.

विशेष म्हणजे देशात लॉकडाऊनची अंमलबाजवणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मजुरांचे पायी स्थलांतर सुरु झाले होते. हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून य कामगारांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची सोय केली  त्यावर गुजरात , बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच राज्यातील नागरिकांना आपल्या राज्यात प्रवेश नाकारला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही पो भरण्यासाठी परराज्यात गेलेल्या आणि कोरोनामुळे पुन्हा आपल्या राज्यात परतणाऱ्या बिहारी मजुरांना ज्या राज्यात आहात तेथेच थांबा इकडे येऊ नका. दरम्यान केंद्र सरकारनेही तसेच आवाहन केले त्यामुळे महाराष्ट्राने आपल्या राज्यात अडकलेल्या युपी , बिहार , गुजरात मधील मजुरांसाठी मदत केंद्र सुरु केले आहेत हि उल्लेखनीय बाब आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!