Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : कोरोनाच्या अफवेने महिला पोलिसाच्या कुटुंबियांचे त्यांनी पाणी बंद केले , माणुसकीचाही पडला विसर !!

Spread the love

जगभर कोरोनाची दहशत असली तरी भारतात मात्र कोरोनाग्रस्तांना मिळणारी वागणूक लक्षात घेता लोक माणुसकी विसरत असल्याचे दिसत आहे.  कोरोनावरून अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत असतात असाच प्रकार दौंड तालुक्यातील भरतगाव या ठिकाणी घडला आहे.  कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलला कोरोना झाला आहे . या अफवेने अक्षरशः तिच्या घरच्यांचे पाणी बंद करून घरावर बहिष्कार टाकण्यात आला आहे, सदर महिला कॉन्स्टेबल ही दंगल नियंत्रण पथकात सेवेत असून या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झालीय अशी अफवा गावामध्ये पसरली, आणि या अफवेने गावातील काही नागरिकांनी अक्षरशः या कुटुंबाचे पाणी बंद केले आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , दौंड तालुक्यातील भरतगाव येथील महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफेवेमुळे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबालाच फटका बसलाय. या महिलेस खोकला व सर्दी असल्याने ही सुट्टी घेऊन आपल्या घरी भरतगाव या ठिकणी आली होती, मात्र खोकला असल्याने तिला कोरोना झालाय या अफवेने गावातील लोक पाणीही देत नाही. अत्यावश्यक गोष्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे या महीलेने सांगितलं. तर सदर महिलेला कोरोना झाला नसून तसे तिला सर्टिफिकेट देखील देण्यात आले असून अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!