Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? म्हणे मोदींचे भाषणाचे रेकॉर्ड मोदींनीच मोडले !!

Spread the love

जगभर आणि देशात  कोरोनाचा कहर चालू असल्याने प्रत्येक भारतीय माणूस कोरोनामुळे भयभीत झालेला आहे . या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीय नागरिकाचे लक्ष  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे असणे साहजिक आहे . मात्र लोकांच्या या मानसिकतेचा फायदा मोदींची लोकप्रियता मोजण्यासाठी केलं जात आहे. मोदींच्या या विषयावरून केलेल्या भाषणाचे मोजमाप करताना हि तुलना करू इच्छिणाऱ्या अधिकाऱ्याने लॉकडाऊनची  घोषणा करणाऱ्या भाषणाकडे प्रत्येक भारतीय डोळे लावून होता असे म्हटले आहे. आतापर्यंत मोदींच्या सर्व भाषणांपैकी लॉकडाऊनच्या भाषणाने रेकॉर्ड तोडल्याची माहिती समोर आली आहे. बार्क इंडिया रेटिंग्जने ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यापूर्वी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. टिव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियंस रिसर्च काउन्सिल (बीएआरसी) च्या रेटिंगनुसार मोदींचे लॉकडाऊनचे भाषण त्यांच्या “जनता कर्फ्यू” आणि नोटाबंदीसह मागील सर्व भाषणांपेक्षा जास्त पाहिलं गेलं.

या बाबत प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी ट्वीट केले की, “बार्क इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २४ मार्च रोजी लॉकडाऊनसंदर्भात केलेले भाषण टिव्हीवर सर्वाधिक पाहिलं गेलं आहे. त्याच्या तुलनेत आयपीएलचा अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्याही मागे पडली आहे. हे भाषण सुमारे २०१ चॅनलवर दाखविण्यात आले. आयपीएलची अंतिम मॅच १३.३ कोटी जनतेने पाहिली होती. तर पंतप्रधान मोदींचे लॉकडाऊनचे भाषण १९.७ कोटी लोकांनी पाहिली. बीएआरसीच्या (BARC) रेटिंगनुसार पंतप्रधानांचे 19 मार्चचे जनता कर्फ्यूचे  भाषण 191 टिव्ही चॅनेल्सवर दाखविण्यात आले होते, ते ८.३० कोटी लोकांनी पाहिले होते. बीएआरसीच्या रेटिंगनुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा पंतप्रधानांनी घटनेच्या कलम ३७० रद्द करण्याबाबत भाषण केले तेव्हा ते १६३ वाहिन्यांवरुन ६.५ कोटी जनतेने पाहिले. तर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा ११४ वाहिन्यांवरुन ५.७ कोटी लोकांनी पाहिल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!