Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : ग्रेट मॅन , पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना हात जोडून पाठवले परत !!

Spread the love

देशातून आणि जगभरातून कोरोनाव्हायरसशी संबंधित अनेक बऱ्या वाईट बातम्या येत आहेत अशीच हि एक बातमी आहे . कोरोना व्हायरसचा फैलाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला तरी काही लोक नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडतात.पण काही लोक मात्र या नियमाचे मनापासून पालन करीत आहेत. त्याचे झाले असे कि , कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पतीने आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना हात जोडून विनम्रपणे आपापल्या घरी पाठविल्याचे वृत्त आहे. या ग्रेट पतीकडून हा आदर्श घेतला पाहिजे.

त्याचे झाले असे कि , आग्रा येथील  न्यू विजय नगर कॉलनीतील नगला धानी भागात राहणारे देवकीनंदन त्यागी यांची पत्नी ममता यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. हि शोकवार्ता समजताच त्यांचे हितचिंतक आणि जवळच्या  नातेवाईकांची गर्दी जमली. दरम्यान शासनाने केलेले लॉकडाऊन आणि गर्दी न जमविण्याच्या शासकीय आदेशामुळे गोंधळ उडाला. मात्र विषय भावनिक आणि संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनाही काही बोलता येईना . दुसरीकडे, कुटुंबातील लोक रडत होते. काय करावं आणि काय करू नये याबद्दल चर्चा सुरू झाल्या. सर्वांनी अंत्ययात्रेमध्ये सामील होण्याचा निर्धार केला. देवकीनंदन यांच्या घराबाहेर गर्दी झाली होती. ही गर्दी पाहताच देवकीनंदन बाहेर आले आणि त्यांनी या प्रसंगी जमलेल्या लोकांना स्पष्टपणे सांगितले की ममता आता परत येऊ शकणार नाहीत. परंतु थोडीसा निष्काळजीपणा झाल्यास समाजातील इतर लोक अडचणीत येऊ शकतात. त्यांनी या प्रसंगी आलेल्या लोकांना विनंती केली की त्यांनी प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत पण लोकांचे आयुष्य संकटात पडू नये हे चांगले. त्यामुळे सगळ्यांनी घरी जा आम्ही १०  लोकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करू असं आवाहन त्यांनी लोकांना केलं.

दरम्यान देवकीनंदन हे सध्या मोठ्या संकटात आहेत. त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला असताना असा कठोर निर्णय घेणं हे कौतूकास्पद आहे. देवकीनंदन यांना तीन मुले आहेत. दोन मुले एक मुलगी. त्यांची पत्नी ममता यांनी असा आग्रह धरला की मुलगी अंजली चांगल्या महाविद्यालयात शिकून वकील व्हावी. मुलगीसुद्धा आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यास तयार होती. तसेच बेंगळुरूच्या एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. २० मार्च रोजी अंजली आग्राला परतली. ती रडत होती आणि म्हणत होती की आई मला एक वकील म्हणून पाहू शकेल अशी माझी इच्छा होती. देवकीनंदन यांचा मोठा मुलगा दीपक लॉकडाऊनमुळे येऊ शकला नाही. तो मर्चंट नेव्हीमध्ये तैनात आहे. सध्या दुबईमध्ये नियुक्ती आहे. निर्बंधांमुळे दीपक तेथून बाहेर पडू शकला नाही. व्हिडिओ कॉलद्वारे त्याला त्याच्या आईचे अंतिम दर्शन देण्यात आले. हे दृश्य पाहून घटनास्थळावर उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!