Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : पत्नीने सांगितले “बाहेरून आलात , अंघोळ करा …” वादानंतर तो बाहेर गेला आणि पत्नीला मिळाली ” हि ” बातमी…

Spread the love

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक बातम्या माध्यमात येत आहेत. अशीच एक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. भमोरा येथील बिचुरैया गावी राहणारा कुंवर पाल सिंह यांचा मोठा मुलगा रवीसिंग (वय ३५) हा मथुरा येथील तेल कंपनीत पेट्रोल पंपांवर फिटर म्हणून काम करतो. दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या गावी आला होता. मथुराहून परत आल्यावर पत्नीने सांगितले की कोरोनाचा धोका वाढला आहे. म्हणून घरात येण्यापूर्वी कपडे बाहेर काढा. आणि कोणाला हात लावण्याआधी आंघोळ करा. यावरून नवरा-बायकोमध्ये वादा झाला आणि नवरा नाराज झाला. यानंतर रवीसिंग घराच्या काही वस्तू घेण्याच्या बहाण्याने बलिया बाजारात गेला परंतु लॉकडाऊनमुळे त्याला कोणतंही सामान सापडलं नाही.

या प्रकरणात शेजार्‍यांचे म्हणणे आहे की, त्याला दारूचे व्यसन होते. लॉक डाऊनच्या काळात दुकाने बंद पडल्यामुळे त्याला दारूही मिळाली नाही. यावेळी नाराज आणि वैतागलेल्या रवीने बहिणीला फोन केला आणि मला काहीच सामान भेटलं नाही. कोरोनामुळे मला खूप भीती वाटत आहे. माझं मन मला काहीतरी वाईट सांगत आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. यानंतर मंगळवारी रात्री गावाजवळ शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रवीचे दोन वर्षांपूर्वी नीरजशी लग्न झाले होते. ग्रामस्थांनी मृतदेह लटकलेला पाहून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ज्यावर भामोरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!