Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुख्यमंत्र्यांचे आवाहन , आहात तेथेच राहा , सरकार तुमची काळजी घेईल….

Spread the love

महाराष्ट्र करोना साथीच्या महत्त्वाच्या टप्प्यात सध्या आला आहे. पुढचे १५-२० दिवस आपल्या सर्वांसाठीच परीक्षेचे आणि कसोटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका. या संकटाला धैर्याने सामोरे जा. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा. कृपा करून घराबाहेर पडू नका. रस्त्यावर गर्दी करू नका, असे आवाहन करतानाच ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणी थोपवू शकणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई, पुणे या शहरांतून आपल्या मूळगावी जाण्यासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. या सर्वांनाच मुख्यमंत्र्यांनी कळकळीची विनंती केली. कुणीही अशाप्रकारे गावी जाण्यासाठी घराबाहेर पडू नये. हे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. तुम्ही सध्या आहात तिथेच राहा, तेच तुमच्या हिताचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कर्नाटकात १० महिन्याच्या चिमुरडीला कोरोना 

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका १० महिन्यांच्या चिमुरडीला करोनाची लागण झाली आहे. दक्षिण कन्नडचे उपजिल्हाधिकारी सिंधु बी. रुपेश यांनी ही माहिती दिली. या पूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये एका ८ महिन्यांच्या मुलाला करोनाची लागण झाली होती. बेंगळुरूतील या करोनाग्रस्त मुलीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तिला बेंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

या मुलीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या कुटुंबातील व्यक्तींना तसेच जवळच्या नातेवाईकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या चिमुकल्या मुलीला करोनाचा संसर्ग कसा झाला याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या चिमुकलीची पूर्णपणे काळजी घेतली जात असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा संसर्ग आसपासच्या परिसरात पसरू नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. आतापर्यंत जगभरात करोना विषाणू लहान मुलांसाठी जीवघेणा सिद्ध झालेला नाही. मात्र, १ वर्षांपासूनची लहान मुले या विषाणूमुळे गंभीर आजारी पडू शकतात. करोना विषाणू हा ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक सिद्ध झाला आहे.

आतापर्यंत एकूण १७ मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७२४ वर पोहोचली आहे. तर, या आजाराने १७ लोकांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचारांती बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज करोनाच्या आणखी २८ रुग्णांची नोद झाली. यात सांगलीतील इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमध्ये काल आढळलेल्या करोना रुग्णांच्या ४ सहवासितांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई आणि ठाणे येथे प्रत्येकी दोन रुग्ण असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे तर १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे.

आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृद्धेचा करोनामुळे मृत्यू झाला. हा राज्यातील करोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे. आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात संशयीत करोनारुग्ण असलेल्या एका ८५ वर्षीय डॉक्टरा मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच ब्रिटनमधून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचारांती बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जगातील प्रमुख देश आणि कोरोना 

दरम्यान, वर्ल्डओमीटरवर दुपारी ४ वाजता अपडेट करण्यात आलेल्या माहिती नुसार जगभरात ५ लाख ६५ हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर या विषाणूने एकूण २५ हजार ४१० लोकांचा बळी घेतला आहे. यामध्ये अमेरिकेतील नवीन रुग्णांची संख्या ६७७१, आजचे मृत्यू ७६, चीन नवीन रुग्ण ५५, आजचे मृत्यू ५ , स्पेन ६, २७३ आणि आजचे मृत्यू ५६९, इराणमधील नवीन रुग्णांची संख्या २९२६ तर आजचे मृत्यू १४४, इंग्लंडमध्ये नवीन रुग्ण २८८५ , आजचे मृत्यू १८१,  नेदरलँड नवीन रुग्णांची संख्या ११७२ तर  आजच्या मृत्यूची संख्या११२ इतकी झाली आहे. इटलीमध्ये  नवीन रुग्णांची संख्या ५९०९ असून आजच्या मृत्यूंची संख्या ९१९ इतकी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!