Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४७ , बंदी असतानाही नमाज आदा केली , ६० जणांविरुद्ध गुन्हा 

Spread the love

राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर गेला असून  सांगलीतील करोनाग्रस्तांची एकूण संख्या २३ झाली असून हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्लामपुरात आढळलेल्या नवीन रुग्णांची संख्या १२ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४२२८ संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ४०१७ चाचण्या निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशभरात करोना विषाणू जलदगतीने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ७२४ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यां पैकी ६६ करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. जगभरात आतापर्यंत ५ लाख २६ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत करोनाग्रस्तांची संख्या ३९ वर गेल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिली असून  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमधील राज्यपालांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

बंदी असतानाही नमाज आदा केली , ६० जणांविरुद्ध गुन्हा 

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं संपूर्ण देशभर तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला आहे. आज या लॉकडाऊनचा तिसरा दिवस… या दरम्यान लोकांनी एकत्र येण्याला आणि गर्दी करण्याला मनाई करण्यात आलेली असतानादेखील अनेक जण ही सूचना धुडकावून लावताना दिसत आहेत. अशाच काही जणांवर उत्तर प्रदेशात कारवाई करण्यात आलीय. उत्तर प्रदेशातील हरदोई आणि बहराइच जिल्ह्यांत मशिदीत नमाज अदा करण्यासाठी लोकांना गोळा करणाऱ्या तीन इमामांसहीत ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बहराइचचे पोलीस अधीक्षक विपिन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाम इमरान खान इतर २० जणांसहीत आझादनगरच्या एका मशिदीत गोळा झाले होते. आदेश झुगारत इमामासहीत या सर्वांनी गर्दीत नमाज अदा केला. उत्तर प्रदेशातील हेल्पलाईन क्रमांक ११२ या क्रमांकाद्वारे याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत देशव्यापी लॉकडाऊन धुडकावून गोळा होणाऱ्या आणि स्वत:सहीत इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

काझी इमरान खान यांनी नमाज अदा करण्यासाठी आपल्याला मशिदीत बोलावल्याचं एकत्र जमलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी इमरान खान आणि इतर २० जणांविरोधात एफआयआर दाखल केली. याचप्रमाणे हरदोई जिल्ह्यात दोन आणखी गुन्हे दाखल करण्यात आल्यात. हरदोईच्या संडीला भागात इमाम मोहम्मद आसिफ आणि इतर २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर कोतवाली पोलिसांनी इमाम अली अहमद आणि इतर २० जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यानंतर पोलिसांनी मुस्लीम समुदायाच्या सर्व इमामांना आणि धार्मिक प्रमुखांना मशिदीत गर्दी न करता आपल्या घरातच नमाज अदा करण्याची विनंती केलीय.

मार्च अखेरपर्यंत ३ चे झाले ७२४

भारतात १ मार्चपर्यंत  केवळ ३ करोनाचे रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण केरळमधील होते. यां पैकी एक इटलीहून परतला होता. तो दिल्लीचा रहिवाशी होता. तर दुसरा रुग्ण दुबईहून परतलेला तेलंगणचा रहिवासी होता. तिसरा रुग्ण हा इटलीचा पर्यटक होता. तो राजस्थानातील जयपूरमध्ये फिरायला आला होता. २ मार्चपासून सुरू झालेला करोना विषाणूचा संसर्ग आजपर्यंत थांबलेला नाही. दर दिवशी रुणांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!