#CoronaVirusEffect : नागपूरची खोटी आकडेवारी टाकणारे तीन अफ़वाबहाद्दर गजाआड !!

Advertisements
Advertisements
Spread the love

देशात आणि राज्यात ‘करोना’चा फैलाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या परिस्थितीचा फायदा उठवून काही समाजकंटक अफवा पसरवत आहेत. नागपुरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यांबाबत फेक ऑडिओ क्लिप तयार करून व्हायरल करणाऱ्या तीन जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे. जय गुप्ता, अमित पारधी आणि दिव्यांशू मिश्रा अशी या आरोपींची नावे आहेत.

Advertisements

दरम्यान नागपूरमध्ये अशाच प्रकारे करोनाग्रस्तांचा चुकीचा आकडा व्हायरल करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या तिघांनी मिळून एक फेक ऑडिओ तयार केला. त्यात गुप्ता आणि पारधी यांचं दोघांचं संभाषण असून त्यात ते नागपूरमध्ये ५९ रुग्ण सापडल्याचा दावा करत आहेत. दिव्यांशू मिश्रा यानं त्याच्या बायकोला पाठविलं आणि पुढे ते व्हायरल झालं, अशी प्राथमिक माहिती आहे. सायबर सेलनं तात्काळ चौकशी करून हे प्रकरण उघडकीस आणलं. सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेलं हे पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार