Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : राज्यात सध्या फक्त सात ते आठ दिवसाचं रक्त शिल्लक आहे. रक्तदान करा : राजेश टोपे

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून आज त्यात पाच जणांची भर पडली आहे. करोना रुग्णांचा आकडा आता १३५ झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसंच, खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक सुरू ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान राज्यात फक्त सात ते आठ दिवसाचं रक्त शिल्लक असून रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार चालू असल्याचे सांगून ते म्हणाले कि , रक्तदान शिबिरांसाठी सर्व प्रकारचं सहकार्य करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. करोनामुळं निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. ‘आतापर्यंत ४२२८ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ४०१७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आता ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या ‘तीन टी’वर भर देण्यात आला आहे. १९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्जचा हा आकडा हळूहळू वाढत जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘राज्यातील अनेक भागांत डॉक्टरांनी भीतीपोटी आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. संकटाच्या काळात वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी असं करणं योग्य नाही. करोनाच्या व्यतिरिक्तही अनेक आजार असतात, ज्यामुळं लोक त्रस्त असतात. त्यांना उपचारांची गरज लागते. त्यांची ससेहोलपट होता कामा नये. डॉक्टरांनी कुणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. त्यांना पुरेसं संरक्षण दिलं जाईल. जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत,’ असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.  दरम्यान शेती व्यवसाय सुरू राहिलाच पाहिजे, शेतीमाल बाजारपेठेत आला पाहिजे, प्रशासनाने मदत करावी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!