Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : शुक्रवारची सार्वजनिक नमाज रद्द, जिल्ह्यातील दीड हजार मशिदींना टाळे , आपापल्या घरात नमाज आदा करण्याचे आवाहन

Spread the love

औरंगाबाद – कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मशिदींमधील शुक्रवारची मोठी नमाजही रद्द करण्यात आली असल्याचे मुस्लिमांच्या इमारते शरय्या संघटनेचे उपाध्यक्ष रशिद मदानी यांनी ‘महानायक आॅनलाईन’ शी बोलतांना स्पष्ट केले. आज गुरुवारी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या सोबंत इमारत ए शरिया च्या पदाधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे मदानी यांनी सांगितले.  मशिदीतील दैनंदिन नमाज यापुर्वीच बंद करण्यात आलेली होती. आज गुरूवार असल्याने उद्या शुक्रवारच्या मोठ्या नमाजाचे काय असा प्रश्न मुस्लिमांमधून विचारला जात होता. आज इमारते शरय्याने शुक्रवारची नमाजही होणार नसल्याचे जाहीर केले. संभाजीनगर जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक मशिदी आहेत. सर्व मशिदी सध्या बंद आहेत.

कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, बाजारपेठांपाठोपाठ मंदिरे बंद करण्याचे आदेश देण्यात आले, जत्रा, उरुस यावरदेखील बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणात नमाजसाठी गर्दी होत असल्याचे आढळून आल्यामुळे शासनाने याविरुध्द कठोर पाऊले उचलण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश दिले होते.
दरम्यान परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मराठवाडा इमारते शरय्या या धार्मिक संघटनेने आधी अजानवर बंदी घातली होती, त्यानंतर टप्प्या टप्प्याने मशिदीतील नमाजवर बंदी घातली, मुस्लिम भाविकांनी मशिदीत नमाजसाठी येऊ नये यासाठी मशिद कर्मचा-यांनी मशिदीतील नमाज पढताना अंथरण्याच्या चादरीही गुंडाळुन ठेवल्या. बुधवारी दुपारी मशिदींमध्ये नमाजसाठी आलेल्या भाविकांना मशिद बंद केलेली असल्याचे सांगून परत पाठवण्यात आले. यानंतर आता शुक्रवारची नमाजही रद्द करण्यात आली आहे.
शुक्रवारची नमाज रद्द
शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात मशिदीत गर्दी होत असल्याने गर्दीमुळे होणा-या कोरोना विषाणूंचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी इमारते शरय्या संघटनेचे मराठवाडा अमीर मुफ्ती नईम यांनी शुक्रवारची नमाजही होणार नसल्याचे जाहीर केले. तसे सर्व मशिदींना आदेश पाठवले. प्रत्येक नमाजीने आपापल्या घरी शुक्रवारची नमाज पढावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच मशिदीमध्ये त्या त्या मशिदीचा मौज्जन आणि पेशइमाम हेच मशिदीत पूर्णवेळ थांबतील व आपले कर्तव्य पूर्ण करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. संभाजीनगर शहरात पाचशे तर जिल्ह्यात एक हजार मशिदी आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!