Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहतील , मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Spread the love

देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी  दुकानात गर्दी करू नये यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत यावर चर्चा झाली. गर्दीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन, सूचना दुकानदारांनी पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश २१ दिवसांसाठी म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉक डाउन करण्यात आला आहे. करोनाचा फैलाव रोखायचा असेल तर घरातच थांबा असं आवाहन राज्य आणि केंद्र सरकारतर्फे वारंवार करण्यात येतं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल डिस्टंस पाळा असं आवाहन केलं आहे. हे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाळलं आहे. कारण वर्षा या त्यांच्या निवासस्थानी करोनावर उपाय योजण्यासाठी जी बैठक पार पडली त्या बैठकीत त्यांनी हे अंतर पाळलेलं दिसलं. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १२५ च्या वर गेली आहे. तर देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन वारंवार केंद्र आणि राज्य सरकारकडून केलं जातं आहे. लोकही सोशल डिस्टंस पाळू लागले आहेत. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना, किराणा मालाच्या दुकानात जाताना रांग लावून आणि एक एक करुन लोक जात आहेत. जेव्हा देश लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला तेव्हा काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र परिस्थितीत बरीच सुधारणा आहे.

दरम्यान करोनाचा धोका टाळायचा असेल तर तो घरात बसूनच टाळता येईल हे लोकांना पटलं आहे. त्यामुळेच देशातला लॉकडाउन आणि महाराष्ट्रातली संचारबंदी ही यशस्वी झालेली दिसते आहे. २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत असंच चित्र राहिलं तर करोनाविरुद्धचा लढा यशस्वी होईल अशी आशा करायला हरकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कृतीतून सोशल डिस्टंस कसं राखा ते दाखवून दिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!