Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : डोनाल्ड ट्रम्प जागतिक आरोग्य संघटनेवर सटकले , चीनची बाजू घेतल्याचा आरोप

Spread the love

जगभरात करोनाच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महिनाभरात या व्हायरस जगभरात पसरला. करोनाच्या संसर्गावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू घेतली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला असून त्यांच्या भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील अनेक देश जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेमुळे नाराज आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने चीनचे कौतुक करणे, त्यांना पाठिशी घालणे चुकीचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. करोनाच्या संसर्गासाठी कोणत्याही एका देशाला जबाबदार ठरवू शकत नसल्याचे म्हटले होते. त्याशिवाय करोना व्हायरसला चायनीज व्हायरस ही म्हणता येणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाला चायनीज व्हायरस संबोधले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. करोनाच्या मुद्यावर चीन व अमेरिकेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

दरम्यान, अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असून मागील पाच दिवसांत तब्बल १० हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोना वेगाने फैलावत असल्याचे चित्र असून चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या आजारामुळे बळींचीही संख्या वाढली असून एक हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सिनेट आणि व्हाइट हाऊसमध्ये २००० अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर करण्याबाबत एकमत झाले आहे. अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ६८ हजार ५७२ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळल्याच्या यादीत चीन, इटली नंतर अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!