Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : घरात राहा , सुरक्षित राहा, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर, कुठलाही तुटवडा नाही : उद्धव ठाकरे

Spread the love

कोरोना व्हायरसचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरस या संकटाचं गांभीर्य ओळखून लोकांनी सहकार्य करावे , अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’, असा धीर देत नागरीकांनी  घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले  आहे. अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही.

दरम्यान सरकारची संपूर्ण यंत्रणा दक्ष झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला संबोधित केलं.  संचारबंदीच्या काळातही काही लोक रस्त्यावर दिसत आहेत. ही बाब गंभीर आहे. लोक विचारतात आम्ही काय मदत करू, मी म्हणतो घरी राहा, बाकी काही करू नका.  लोकांनी सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, संकट मोठं आहे.  या संकटाचा संधी म्हणून कोणी उपयोग करु नये. यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. संकट काळात रक्ताचा तुटवडा  पडू शकतो.  लालबागच्या राजा गणपती मंडळाने रक्तदान शिबीरं सुरू  केली आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सरकारने जनतेचे जगणे थांबवलेले नाही तर अधिक जगण्यासाठी थोडीशी शैली बदलावी लागली आहे, असे नमूद करताना धान्य, दूध, औषधे आणण्यासाठी तुम्ही निश्चितच घराबाहेर पडा पण नुसती टेहळणी करण्यासाठी आणि फेरफटका मारायला बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तुम्ही रास्त कारणासाठी घराबाहेर पडला असाल आणि तुम्हाला कुणी अटकाव करत असेल तर पोलिसांना शंभर नंबरवर कळवा. पोलीस तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अन्नधान्याची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही. मात्र हा माल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचे वाहनावर असावे, कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र असावे, इतकीच खबरदारी घ्यायची आहे. सरकारने जनतेचे जगणे  थांबवलेले नाही तर अधिक जगण्यासाठी थोडीशी शैली बदलावी लागली आहे. धान्य, दूध, औषधे आणण्यासाठी तुम्ही निश्चितच घराबाहेर पजा पण नुसती टेहळणी करण्यासाठी आणि फेरफटका मारायला बाहेर पडू नका. तुम्ही रास्त कारणासाठी घराबाहेर पडला असाल आणि तुम्हाला कुणी अडवलं तर पोलिसांना शंभर नंबरवर कळवा. पोलीस तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. मुंबईत धडक कारवाई करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा जप्त केला. या कारवाईचं कौतुक -आपण सगळे एकजुटीने या संकटाला सामोरे जावूया व त्यावर मात करूया. -रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने रक्तदान शिबीर सुरू केले आहे. त्याचंही कौतुक

आपलं सरकार

Click to listen highlighted text!