Aurangabad Crime : पुंडलिकनगर अपहरण प्रकरणी एकाला गुजराथ मधून आणले तर दुसरा शरण आला….

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरात घडलेल्या अतुल हजारे अपहरण प्रकरणातील उरलेल्या दोन आरोपींपैकी मुख्य आरोपी गणेश लालझरे याला सुरत मधून बेड्या ठोकून आणल्याचे कळतांच परतूरला लपून बसलेला अनिल पाचंगे पुंडलिकनगर पोलिसांना शरण आला.
काल जसपालसिंग आणि जाॅनसिंग ला अटक केल्यानंतर गणेश लालझरे चा ठावठिकाणा जसपालसिंग आणि जिॅनसिंग च्या सीडीआर वरुन कळाला. त्यानुसार पीएसआय प्रभाकर सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, प्रमोद मुळे यांच्या पथकाने सुरत येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या गणेश लालझरे ला ताब्यात घेतले. त्याला अटक झाल्याचे कळताच अनिल पाचंगे ने शरणागती पत्करली. वरील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नक्षाम सोनवणे, पीएसआय सोनवणे, बाळाराम चौरे, यांनी पार पाडली.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार