Aurangabad Crime : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश धुडकावला , विक्री होणारे मद्य जप्त तिघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद -जिल्हाधिकार्‍यांचा आदेश धुडकावून मद्यविक्री करणार्‍या तिघांना वाळूज औद्योगिक पोलिसांनी मद्यसाठ्यासहित जेरबंद केले.त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संदीप अंजन पिंपळे(३५) रा पंढरपुर, सुधिर पांडुरंग बनकर (३१) रा.वडगाव कोल्हाटी आणि प्रशांत देविदास काळे (२७) रा.बजाजनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील तिघांनी ५५हजार रुपयांचे देशी विदेशी मद्य बंदी असतांना विक्री करतांना गस्तीवरील पोलिसांच्या तिवडीत सापडले.कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर शासकीय आदेश पायदळी तुडवणार्‍यांवर कडक कारवाई केली जात आहे.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विठ्ठल चासकर, प्रशांत गंभीरराव,पोलिस कर्मचारी वसंत शेळके, विनोद नितनवरे,सुधिर सोनवणे, नवाब शेख यांनी पार पाडली

आपलं सरकार