#CoronaVirusEffect : कोरोनातून ” ती ” बारी झाली आणि डॉक्टरांनी हातात दिले २६ लाखांचे बिल …!!

Advertisements
Advertisements
Spread the love

जगात सर्वत्र  कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली असून चीन नंतर जगातील सुमारे ११० हुन अधिक देशनां कोरोनाने सळो की पळो करून सोडले आहे.  महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही  कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात असून  आतापर्यंत या व्हायरसने 200 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या महामारीपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी जागरुक राहाण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान, अमेरिकेतील बोस्टन शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, कोरोना व्हायरसवर उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या हातात हॉस्पिटल प्रशासनाने सुमारे २६ लाख रुपयांचे बिल दिले आहे.

Advertisements

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार , फेब्रुवारीत एस्किनी नामक महिलेला डोके दुखी, श्वास घेण्यात त्रास होणे आणि मायग्रेनचा होत होता. ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला औषधीचं रिएक्शन झाल्याचं सांगून इमरजन्सा सर्व्हिसमध्ये पाठवलं. एस्किनीच्या काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यात तिला निमोनिया झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. नंतर तिला औषधी देऊन घरी सोडण्यात आलं. परंतु काही दिवसांत एस्किनीचे बॉडी टेंपरेचर वाढल्यानं तिची Covid-19 ची टेस्ट करण्यात आली. सातव्या दिवशी एस्किनीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

Advertisements
Advertisements

दरम्यान एस्किनी काही दिवसांत बरी झाली आणि  हॉस्पिटलने एस्किनीच्या हातात २६ लाख रुपयांचे बिल दिले. एस्किनीने हॉस्पिटलने दिलेल्या बिलावर हरकत नोंदवली. दरम्यान, अमेरिकेत २ कोटी ७० लाख नागरिकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही. एस्किनी ही देखील त्या पैकी एक आहे. अमेरिकेत कोरोनाची टेस्ट विनामुल्य आहे. परंतु ट्रीटमेंटचा खर्च रुग्णाला स्वत: करायचा आहे. आतापर्यत अमेरिकेत सात राज्यांमध्ये प्रतिबंध लावण्यात आले आहेत. ‘जॉन्स हॉप्किन्स यूनिव्हर्सिटी’नुसार अमेरिकेत कोरोनामुळे २४९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १९००० हून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

Leave a Reply

आपलं सरकार