Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : महावितरणचा विद्युत बिलांबाबत दिलासादायक निर्णय

Spread the love

राज्यातील नागरिक कोरोनाचा सामना करीत असल्याने या पार्श्वभूमीवर  विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. २३ मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात यावे, अशी सूचनाच त्यांनी दिली. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या वेबसाइटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाइल नंबरवर बिलासंबंधीचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. वीजचोरी व बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी करू नये, अशा सूचनाही राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!