Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : ” तो ” विमानात शिंकला आणि सर्व विमान क्षणार्धात रिकामे झाले…

Spread the love

देशभर कोरोनाचा कहर चालू असून नागरिक कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे विमानतळावर घडलेला असाच एक प्रसंग बातमीचा विषय झाला आहे . त्याचे झाले असे कि , एअर एशिया इंडियाच्या पुणे-दिल्ली विमानात बसलेल्या एका प्रवाशाला जोरात शिंक आली. हा प्रवासी शिंकताच पायलटसह इतर क्रू मेंबर्सही घाबरले. शिंकणाऱ्या प्रवाशाला तत्काळ कोरोनाचा संशयीत रुग्ण असल्याचं समजून आपात्कालीन गेटमधून तत्काळ वैमानिकानंच थेट उडी मारली. एअर एशिया इंडियाचं I5-732 हे विमान पुण्याहून दिल्ली विमानतळावर प्रवाशांना घेऊन निघालं होतं. सर्व प्रवासी विमानात बसले आणि विमान दिल्लीसाठी निघणार एवढ्यात एका प्रवाशानं शिकण्यास सुरुवात केली. ह्या प्रवाशाला कोरोनाचा संशयित तर नाही असं विचार त्याच्या मनात आला आणि कोरोनाची आपल्यालाही लागण होईल या भीतीनं त्याने आपात्कालीन गेटमधून विमान तिथेच सोडून उडी मारली आहे. ही घटना पुणे विमानतळावर २० मार्चरोजी घडल्याचे वृत्त  आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुणे विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान इमरजन्सी गेटमधून पायलटने उडी मारल्यानंतर सर्व प्रवाशांनीही मागच्या गेटमधून घाबरून बाहेर पडण्यास सुरुवात केली. फक्त शिंकणाऱ्या व्यक्तीला विमानात ठेवण्यात आलं. त्यानंतर सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. या स्क्रिनिंग टेस्टमध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या शिंकणाऱ्या प्रवाशाला सर्दी झाल्यानं शिंका येत होत्या अशी माहिती मिळाली आहे. मात्र लोकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठा धस्का घेतला. भारतात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ४१५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!