Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : भारताच्या परिस्थितीवरून शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता , Social Distancing आणि  Self Quarantine ला गांभीर्याने घेण्याचे आवाहन

Spread the love

देशभरात कोरोनाग्रस्त प्रकरणं वाढत आहेत. सरकार त्यावर नियंत्रणासाठी झटतअसून लोकांनी जर स्वतःला Social Distancing आणि  Self Quarantine  केले नाही तर देशातील एकूण परिस्थिती पाहता एकतर भारताची अवस्था चीनप्रमाणे व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकेल किंवा भारताची अवस्था इटलीप्रमाणे होईल, अशी चिंता देशातील शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबाबत अभ्यास करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत अशी भीती व्यक्त केली आहे. यापैकी एक वैज्ञानिक हे सरकारसोबत काम करत आहेत.

या मुलाखतीत हे वैज्ञानिक म्हणाले कि , भारताने एका कठीण टप्प्यात प्रवेश केलेला आहे. अशावेळी भारताबाबत दोन  परिस्थिती समोर आहेत. एक तर Social Distancing आणि Self Quarantine करून चीनप्रमाणे आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरेल आणि तसं नाही झालं तर इटलीसारखी परिस्थिती होईल आणि देशाची आरोग्यव्यवस्थाच कोलमडेल. त्यामुळे २ ते ३ आठवडे भारतासाठी महत्त्वाचे आहेत.  भारतात पुढील २ ते ३ आठवडे कोरोनाव्हायरसची प्रकरणं ४१५ ते १००० या दरम्यान जाऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अहवालावरून हे अंदाज वर्तवले जात आहेत. या अहवालानुसार मॉडेल तयार करण्यात आलेत. या मॉडेल्सच्या आधारे इतर देशांमधील व्हायरसचा प्रसार किती आहे, हे तपासण्यात आलं आणि त्यानुसार संभाव्य प्रकरणांचा अंदाज बांधण्यात आला आहे.

दरम्यान चेन्नईच्या मॅथेमेटिकल सायन्सेसचे प्राध्यापक सीताभ्र सिन्हा यांनी सांगितलं की, “भारतात ज्याप्रमाणे हा आजार पसरतो आहे, त्याचा विचार करत मार्च अखेरपर्यंत कोरोनाव्हायरसची प्रकरणं १००० पर्यंत पोहोचू शकतात” चेन्नईतील मॅथेमेटिकल इन्स्टिट्युटचे असोसिएस प्रोफेसर सौरिश दास यांनी ट्रान्सफर लर्निंग या पद्धतीचा अवलंब केला आहे. यामार्फत इटली, चीन आणि कोरोनाव्हायरसमुळे प्रभावित झालेल्या इतर सर्व देशांमध्ये व्हायरसचा प्रसार कसा झाला ते पाहून भारतातील परिस्थितीचा अंदाजा घेऊन समांतर अभ्यास केला जातो आहे.

दास यांनी News 18 ला ई-मेल मार्फत दिलेल्या एका उत्तरात म्हटलं, “जर समजा चीनप्रमाणे भारतातही हा आजार पसरला आणि चीनप्रमाणेच सेल्फ क्वारंटाईन आणि इतर पावलं उचलली, तर चीनप्रमाणे भारतातही आपल्याला यश मिळेल. जर असं झालं तर भारतात १५ एप्रिलपर्यंत फक्त ४-५  प्रकरणं दिसतील, असा अंदाज आहे. मात्र जर भारत या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवू शकलं नाही तर इटलीच्याच मार्गावर जाईल. १५ एप्रिलपर्यंत प्रकरणं ३५०० पेक्षाही जास्त वाढू शकतील” भारतात आतापर्यंत३१३ कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळलेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजाराचा प्रभाव, त्यामध्ये येणारी कमी, सोशल डिस्टेंसिंग आणि क्वारंटाईन यावर आता भारतातील पुढील परिस्थिती अवलंबून आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!