Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : पोलिस आयुक्तालयात पत्रकारांना प्रवेशासाठी पासेस मागणे चुकीचे – अनिल देशमुख

Spread the love

औरंगाबाद -एकीकडे देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसमुळे सर्तक राहण्याकरता शासनातर्फे विविध उपाययोजना करंत असतांना माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसआयुक्तालयात प्रवेशासाठी पासेसचे निर्बंध घालणे योग्य नाही.असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महानायक आॅनलाईनशी बोलतांना व्यक्त केले.आज सकाळी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनीही पत्रकारआणि पोलिसांच्या व्हाॅट्सअॅपग्रुपवर पत्रकारांना पोलिसआयुक्तालयात प्रवेशासाठी पासेस घेण्याच्या सूचना करणारा मेसेज व्हायरल केला.
काही दिवसांपूर्वी वाळूज पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेली फिर्यादी आरोपीला अटक करावी मागणीसाठी पोलिसआयुक्तालयात आली होती.त्या फिर्यादीने पोलिसउपायुक्त मीना मकवाना यांच्या दालनात आरोपी अटक होत नसल्याचे कारण पुढे करंत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.त्यानंतर उपायुक्त मकवाना यांनी पत्रकारांनाही पोलिसआयुक्तालयात येतांना रोज परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही अशी भूमीका घेतली हा प्रकार गृहमंत्री अनिल देशमुख यांना कळल्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहर पोलिसांच्या रव्वया बाबत तीव्र नाराजी व्यक्त करंत औरंगाबाद पोलिसआयुक्तांशी आपण बोलणार असल्याचे सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!