Aurangabad Crime : पुंडलिकनगर अपहरण : रेकाॅर्डवरच्या दोघांना बेड्या,नांदेडमधे लपून बसले होते आरोपी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – गेल्या १७ मार्च रोजी गजानन महाराज परिसरातील हाॅटेल मधून पैशाच्या व्यवहासातून तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या चौघापैकी दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनि नांदेडमधून जेरबंद करुन आणले.
जसपालसिंग हरिसिंग जुनी(२४) आणि जाॅनिसिंग उत्तमसिंग पटवा (३२) दोघेही रा.परतूर अशी अटक आरोपींची नावे आहेत.दोघांवरही तीन खुनाचे आणि चार खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे जालना जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात आहेत.परतूरच्या गणेश लालझरे या सावकाराकडून सतीष हजारे नामक व्यक्तीने १लाख ७० हजार रु.शेकडा ५टक्के व्याजाने घेतले होते. मात्र परतावा लालझरेने शेकडा ५० रु.ने घेतला. तसेच हजारे यांच्या परतूर मधील घराला ताळे ठोकले. हजारे यांनी लालझरे व्यवहाराला कंटाळून परतूर सोडून एक महिन्यापासून पुंडलिकनगर परिसरात राहात होते. दरम्यान सतीष हजारे यांचा मुलगा अतुल चे अपहरण वरील आरोपींसहित गणेश लालझरे आणि अनिल पाचंगे यांनी करण्याचा प्रयत्न केला पण पुंडलिकनगर पोलिसांगी प्रसंगावधान दाखवत अतुल हजारेची वरील चौघांच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरील चौघांपैकी दोन आरोपी नांदेड मधे असल्याची माहिती खबर्‍याने एपीआय सोनवणे यांना देताच पुंडलिकनगर पोलिसांनी जसपालसिंग आणि जाॅनसिंग यांना नांदेडहून शहरात आणले व अटक केली. वरील कारवाई एपीआय घन्नशाम सोनवणे, पीएसआय प्रभाकर सोनवणे,रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके,शिवाजी गायकवाड , प्रविण मुळे यांनी पार पाडली.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार