Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बनावट सॅनिटायझरची विक्री करणा-या मेडिकल चालकाविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असताना समर्थनगरातील मेडिकल मालकाने बनावट सॅनिटायझरची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्यावर अन्न-औषध प्रशासनाने छापा मारुन आठ ते नऊ बाटल्या जप्त केल्या असून, या सॅनिटायझरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये. म्हणून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यात औषधी दुकानांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, औषधी दुकानदार सॅनिटायझरचा काळाबाजार करताना अन्न-औषधी प्रशासनाच्या हाती लागला आहे. समर्थनगरातील सोहिंदा मेडिकोजचा मालक अशोक भोजराज सोहिंदा (रा. गणेश आर्केड, शॉप क्र. २, प्लॉट क्र. ११४) याच्या दुकानाची १६ मार्चला अन्न-औषध प्रशासनाने तपासणी केली. तेव्हा स्टरलीअम नावाचे ब्रँड वापरुन तो सॅनिटायझर्सच्या बाटल्या विना बिल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करताना आढळला. त्यामुळे त्याच्या दुकानातून अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने सॅनिटायझर्सच्या सर्व बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांमधील नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सोहिंदा याच्याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक एस. व्ही. राऊत करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!